Nashik | कुंभमेळ्याच्या तयारीत महापालिका गतीने सक्रिय | CSR अंतर्गत होणार सिंहस्थ कामांचा विकास
नाशिक (Simhastha Kumbh Mela Nashik 2027): २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या (Simhastha Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर अद्याप शासनाकडून अपेक्षित निधी मिळाला नसल्याने नाशिक महापालिकेला (Nashik Municipal Corporation) व्यावसायिक व कॉर्पोरेट कंपन्यांकडे CSR (Corporate Social Responsibility) निधीसाठी झोळी पसरवावी लागत आहे.
सिंहस्थासाठी प्रस्तावित १५ हजार कोटींच्या आराखड्याला अद्याप मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे महापालिकेने CSR फंडाचा वापर करून सिंहस्थ कामे करण्याचा निर्णय घेतला आहे.
ठळक मुद्दे | Key Highlights
- Singhstha Kumbh 2027 साठी राज्य शासनाकडून निधी मिळण्यात उशीर
- महापालिकेचा ३०० कोटींच्या थेट कर्ज व २७५ कोटी कर्जरोखे उभारण्याचा निर्णय
- CSR निधीतून सिंहस्थ कामे करण्याचे आयुक्त करिश्मा नायर यांचे आदेश
- कामांची यादी दोन दिवसांत सादर करण्याचे सर्व विभागप्रमुखांना निर्देश
CSR निधीतून सिंहस्थसाठी सुविधा निर्माण करण्याचा प्रयत्न
सिंहस्थ मेळ्यात येणाऱ्या लाखो भाविक, साधू-संत आणि पर्यटकांसाठी आवश्यक सुविधांची उभारणी करण्यासाठी, आयुक्त करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली CSR फंडाच्या माध्यमातून प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सर्व विभागप्रमुखांना कामाचे नाव, स्वरूप, स्थळ, खर्चाचा अंदाज, संभाव्य CSR संस्था व नागरिकांना होणारा फायदा या बाबींची सविस्तर माहिती सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
कुंभमेळा आराखडा आणि निधीचा प्रश्न
- सिंहस्थ कुंभमेळा 2027 साठी आराखडा: 15,000 कोटी रुपये
- राज्य सरकारकडून मंजूर तरतूद: फक्त 1,000 कोटी रुपये (अद्याप महापालिकेला वाटप स्पष्ट नाही)
- स्वतःच्या स्तरावर निधी उभारणी: 300 कोटी थेट कर्ज + 275 कोटी कर्जरोखे
- CSR अंतर्गत कामांची यादी तयार करण्याची प्रक्रिया सुरू
सिंहस्थ कुंभमेळा 2027 चे महत्त्व आणि तयारी (Simhastha Kumbh Mela Nashik 2027)
सिंहस्थ कुंभमेळा हा नाशिकसाठी एक धार्मिक, सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा सोहळा आहे. लाखो भाविकांच्या स्वागतासाठी रस्ते, स्वच्छता, पाणी, वीज, वैद्यकीय सेवा, वाहतूक व्यवस्था, हायटेक सुविधा अशा कामांची यादी तयार केली जात आहे.