सिन्नर मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील 40 ते 50 कारखान्यांचे केमिकल मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनीचा

Screenshot 2024 09 06 105723

सिन्नर मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील 40 ते 50 कारखान्यांचे केमिकल मिश्रित पाण्यामुळे नापीक झालेल्या शेतजमिनीचा मोबदला मिळावा महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या नाशिक कार्यालय कारभाराच्या विरोधात परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या वतीने बेमुदत साखळी उपोषण महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालय आयटीआय सिग्नल येथे सुरू करण्यात आले आहे
सिन्नर मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील केमिकल युक्त कंपन्यांमुळे परिसरातील सुमारे 100 एकर शेती नापीक झाली असून परिसरातील पाण्याचे नैसर्गिक स्रोत सुद्धा खराब झाले आहे यामुळे वाड्या वस्त्या मळे परिसरामध्ये राहणारे शेतकऱ्यांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला झाला असून याचबरोबर मुक्या जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे
याबाबत गेल्या दोन वर्षापासून प्रदूषण नियंत्रण मंडळ नाशिक कार्यालयाशी सातत्याने पत्रव्यवहार करून देखील अधिकारी कुठल्याही प्रकारची दखल घेत नसल्याने शेतकऱ्यांनी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्य विशाल भदर्गे यांच्या माध्यमातून मंगळवार पासून साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे
कारखान्याकडून येणाऱ्या रसायन मिश्रित दूषित पाण्यामुळे परिसरात उग्र वास निर्माण होत असून आरोग्याचा प्रश्न देखील गंभीर होत चालला आहे त्यामुळे परिसरातील मोठ्या प्रमाणात पिकांची हानी झाली असून याबाबत पुरावे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे तात्कालीन एस आर ओ अमर दुर्गुळे आणि विभागीय अधिकारी निंबाजी भड यांना दिलेले असतानाही आतापर्यंत कोणतेही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये
दरम्यान दोन दिवसापासून सुरू असलेल्या या आंदोलनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कोंडाजी मामा आव्हाड यांनी भेट दिली असून बाधित शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे साधन नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यामुळे शासनाने न्याय मिळवून द्यावा अशी मागणी कोंडाजी मामा आव्हाड यांनी यानिमित्ताने केले आहे

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

कोंडाजी आव्हाड

आंदोलन सुरू करताच मंडळाने धातुर मातुर कारवाई करत कंपन्यांना संरक्षण देण्यासाठी तसेच आंदोलकांना दाखवण्यासाठी कारखान्यांना क्लोजर नोटीस दिली असून यात कोणत्याही प्रकारचा रिमार्क देण्यात आला नाहीये त्यामुळे कंपन्यांना वाचवण्यासाठीच ही नोटीस देण्यात आल्याचा आरोप परिवर्तन कामगार सेनेचे अध्यक्ष विशाल भदर्गे यांनी केला आहे

विशाल भदर्गे

दोन वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत असून भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे गेल्या पंधरा वर्षापासून आमच्या शेतीचे नुकसान होत आहे कोणत्याही अधिकाऱ्याकडे आमची तक्रार केली तर आम्ही त्यांना हप्ते वाढून देऊ अशी अरेरावीची भाषा कारखानदारांकडून होत असल्याचा आरोप दत्तू शिरसाठ यांनी केला आहे

दत्तू शिरसाठ शेतकरी

गेल्या तीन दिवसा पासून सुरु असलेल्या आंदोलन ला निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे, निमाचे संचालक राजेश गडाख, मुसळगाव ग्रामपंचायतचे सरपंच सचिन शिरसाठ, तंटामुक्ती अध्यक्ष पोपटराव शिरसाट य आदींनी शेतकऱ्यांच्या उपोषण स्थळी भेट घेत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला

या आंदोलनाप्रसंगी परिवर्तन कामगार सेना महाराष्ट्र राज्याचे विशाल भदर्गे प्रमोद मुसळे ,सदाशिव झाडे, सोपान डावरे बाळासाहेब शिरसाट दीपक शिरसाट उद्धव शिरसाट , संतोष शिरसाट , रमेश शिंदे, दत्तू शिरसाट शंकर वाघ, पंढरीनाथ शिंदे किशोर शिंदे खंडू शिंदे राजेंद्र शिंदे माधव शिंदे रंगनाथ जाधव, आदींसह शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले

Leave a Reply