Slaughterhouses Closed in Nashik | स्वातंत्र्यदिन 2025 : नाशिकमध्ये कत्तलखाने बंद, महापालिकेचे परिपत्रक जारी

download 77

Nashik News | Nashik Municipal Corporation Update | Slaughterhouses Closed in Nashik

नाशिक : स्वातंत्र्यदिन 15 ऑगस्ट 2025 रोजी नाशिक महानगरपालिकेचा (Nashik Municipal Corporation) अधिकृत कत्तलखाना पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी यासंदर्भातील परिपत्रकावर स्वाक्षरी केली असून, ते बुधवार (13 ऑगस्ट) रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध होणार आहे.

शहरात सध्या अंदाजे 1,000 मांस व मासळी विक्रीची दुकाने कार्यरत आहेत. स्वातंत्र्यदिनी मांसविक्री बंद ठेवण्याची मागणी होत असली तरी, महापालिकेने 1988 च्या शासन नियमाचा आधार घेऊन केवळ कत्तलखानेच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

राज्यातील काही महापालिकांनी आधीच मांसविक्रीसह कत्तलखाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, नाशिक महापालिकेने सध्या फक्त नोटिफाइड कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा निर्णय व्यापक पातळीवर घेतल्यास, उद्धव ठाकरे यांची शिवसेना, मनसे, शरद पवार यांचे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांसारखे राजकीय पक्ष आक्रमक भूमिका घेऊ शकतात, अशी शक्यता आहे.

महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाने मंगळवारी सायंकाळी आयुक्तांकडून कत्तलखाने बंद करण्याच्या परिपत्रकावर सही घेतली. मात्र, तो आदेश बुधवारी प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मुख्य मुद्दे: (Slaughterhouses Closed in Nashik)

  • 15 ऑगस्ट 2025 : नाशिक महापालिकेचे कत्तलखाने बंद
  • फक्त नोटिफाइड कत्तलखाने बंद ठेवण्याचा निर्णय
  • 1988 च्या शासन नियमाचा आधार
  • मांसविक्रीबाबत निर्णय झाल्यास राजकीय वाद पेटण्याची शक्यता