सातपूर येथील धार्मिक स्थळ हटवण्याची कारवाई आता वादाच्या भोवऱ्यात
Smita zagade statement 3 | नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील सातपूर येथील एक धार्मिक स्थळ हटवण्याच्या महापालिकेच्या कारवाईवर आता सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्याचे वृत्त समोर आले आहे. तथापि, नाशिक महापालिकेने या प्रकरणावर आपली स्पष्ट भूमिका मांडत माहिती दिली आहे की, त्यांना या संदर्भात कोणतीही अधिकृत नोटीस मिळालेली नाही.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
महापालिकेचा स्पष्ट युक्तिवाद
“आम्हाला नोटीस मिळालेली नाही” – अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे(Smita zagade)
महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे यांनी म्हटले की,
“सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाली असली, तरी महापालिकेला याबाबत कोणतीही अधिकृत नोटीस प्राप्त झालेली नाही. आम्हाला याची कोणतीही कल्पना नव्हती, आणि जी माहिती प्रसारित होत आहे, ती चुकीची आहे.”
कायदेशीर कारवाईचा दावा
स्मिता झगडे यांनी सांगितले की,
“सदर दर्गा महापालिकेच्या ओपन स्पेसमध्ये अनधिकृतपणे उभारलेली होती. स्थानिक नागरिकांकडून अतिक्रमणाच्या अनेक तक्रारी मिळाल्या होत्या. शासन निर्णय 2011 आणि 2016 च्या आदेशांनुसारच कारवाई केली गेली असून ती पूर्णतः कायदेशीर आहे.”
या प्रकरणाला आता काय वळण मिळते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत आदेशाची प्रत मिळेपर्यंत महापालिकेची पुढील कारवाई ठप्प असण्याची शक्यता आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांमध्ये यासंदर्भात चर्चेला उधाण आले आहे.