NASHIK : सोमेश्वरजवळील अपघातात ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू

Someshwar jawal apghat

गंगापूररोडवरील सोमेश्वरजवळ सोमवारी झालेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनाच्या धडकेत पंचवटीतील ज्येष्ठ दाम्पत्याचा मृत्यू झाला. सुरेश वाखारकर यांचा जागीच मृत्यू झाला, तर विद्या वाखारकर यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अपघातासाठी जबाबदार महिला वाहनचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. वाखारकर कुटुंब मूळचे नागपूरचे असून, सध्या पंचवटीतील अमृतधाम परिसरात राहत होते.