South Korea plane crash : दक्षिण कोरियात विमान क्रॅश; २८ जणांचा मृत्यू, अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल

a plane on fire with black smoke coming out of it

South Korea plane crash : दक्षिण कोरियातील मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर रविवारी एक मोठा विमान अपघात झाला. लँडिंग दरम्यान विमान घसरून धावपट्टीच्या सीमेवरील भिंतीला धडकले आणि त्यानंतर स्फोट होऊन विमानाला आग plan crash लागली. या भयानक अपघातात २८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अपघाताचे भीषण स्वरूप

अपघातग्रस्त विमानात एकूण १८१ जण प्रवास करत होते, ज्यामध्ये १७५ प्रवासी आणि ६ क्रू मेंबर्स होते. धडक आणि स्फोटामुळे धुराचे प्रचंड लोट पसरले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून तो पाहून या अपघाताचा थरारक अनुभव येतो.

रुग्णालयात उपचार सुरू

या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यामध्ये काही प्रवाशांची प्रकृती चिंताजनक आहे.

राष्ट्राध्यक्षांचा शोक आणि आदेश

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मुआन विमानतळावर तातडीने बचाव कार्य करण्याचे आदेश दिले असून आपत्कालीन पथके घटनास्थळी पाठवण्यात आली आहेत.

यापूर्वीचे अपघात

सदर घटनेने विमान सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू असून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य ती पावले उचलण्याचे संकेत दिले आहेत.