Tamannaah Bhatia : महादेव बेटिंग अॅप प्रकरणी ईडीची कारवाई; तमन्ना भाटियाची चौकशी सुरू

tamannaah-bhatia-ed-inquiry-mahadev-betting-app-case

तमन्ना भाटिया : बॉलिवूड अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. महादेव बेटिंग अॅप प्रकरणात ईडी (प्रवर्तन निदेशालय) कडून तिची चौकशी करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी तमन्नाला ईडीने समन्स धाडलं होतं, त्यानंतर तिने गुवाहाटी येथील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली. ती तिच्या आईसोबत ईडी कार्यालयात आली होती, आणि तिथे तिची काही तास चौकशी करण्यात आली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

तमन्नावर आरोप आहे की तिने FairPlay नावाच्या अॅपचं प्रमोशन केलं, जे महादेव बेटिंग अॅपशी संबंधित असल्याचं सांगितलं जात आहे. या अॅपच्या माध्यमातून क्रिकेट, पोकर, बॅडमिंटन, फुटबॉल यांसारख्या अनेक खेळांवर सट्टा लावता येतो. अॅपच्या प्रमोशनमुळे तमन्ना चर्चेत आली आणि तिच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणात रणबीर कपूर, श्रद्धा कपूर, आणि कपिल शर्माच्याही चौकशी झाली होती.

ईडीने आतापर्यंत या प्रकरणात ४९० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. महादेव बेटिंग अॅप कडून लोकांना आमीष दाखवण्यात आलं होतं की, ५७ हजार रुपये गुंतवल्यास रोज ४ हजार रुपये मिळतील. पण लोकांचे पैसे क्रिप्टो करन्सी आणि बिटकॉईन्समध्ये गुंतवले गेल्याचं समोर आलं आहे.