मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे भारतीय संघाला मनःपूर्वक अभिनंदन
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भारतीय संघाचा अभिमानास्पद विजय
Team India historic victory : भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर तब्बल १२ वर्षांनंतर आपले नाव कोरले असून, या ऐतिहासिक विजयाने संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे. अंतिम सामन्यात न्यूझीलंडवर थरारक विजय मिळवत भारतीय संघाने जागतिक क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले.
मुख्यमंत्री फडणवीस: ‘भारतीय संघाने क्रिकेट प्रेमींसाठी अविस्मरणीय क्षण निर्माण केले’
या ऐतिहासिक विजयाबद्दल (Team India historic victory ) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की,
“भारतीय संघाने सांघिक भावना, जिद्द आणि चिकाटीतून क्रिकेट प्रेमींसाठी अवर्णनीय आनंदाची पर्वणी आणली आहे. संपूर्ण संघाने सुरुवातीपासून वर्चस्व राखत अंतिम विजय मिळवला, ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.”
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्णधार रोहित शर्मा याचे विशेष कौतुक करताना सांगितले की, त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अप्रतिम खेळ दाखवत चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
उपमुख्यमंत्री अजित पवार: ‘भारतीय क्रिकेट संघाने देशाचा झेंडा उंचावला’
उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी देखील भारतीय संघाचे अभिनंदन केले. त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की,
“भारतीय संघाने दाखवलेली जिद्द, समन्वय आणि संघभावना प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे. अंतिम सामन्यात खेळाडूंनी दाखवलेली चपळता, आत्मविश्वास आणि जिंकण्याची तळमळ ही भारतीय क्रिकेटच्या लौकिकास साजेशी होती.”
भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ सुरू!
भारतीय संघाचा हा विजय तरुण खेळाडूंना प्रेरणादायी ठरणार आहे. संघाने उंचावलेला हा विजयाचा झेंडा भविष्यातही असाच फडकत राहो, अशी आशा क्रिकेटप्रेमींनी व्यक्त केली आहे.
भारतीय संघाच्या या नेत्रदीपक विजयानंतर सर्वत्र आनंदाचे वातावरण असून, क्रिकेटप्रेमी विजयाचा जल्लोष साजरा करत आहेत. भारतीय संघाने पुन्हा एकदा सिद्ध केले की ते जागतिक क्रिकेटचे अनभिषिक्त सम्राट आहेत!