महाविकास आघाडीतर्फे ठाकरे गटाचे माजी आमदार वसंत गीते यांना नाशिक मध्य विधानसभा मतदार संघातून उमेदवारी निश्चित झाली असून त्यांना एबी फार्म देखील मिळाला आहे. त्यामुळे गीते यांनी प्रचाराला सुरुवात केली असून काल काठे गल्ली, माणेकशा नगर येथील मतदारांशी संवाद साधला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक मध्य या जागेसाठी काँग्रेसने महाविकास आघाडीत आपला दावा केला होता, मात्र या वेळी ठाकरे गटाचे वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मागील वेळी या मतदारसंघातून डॉ. हेमतला पाटील या उमेदवार होत्या.
महायुती आघाडीकडून भाजपच्या विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपच्या पहिल्या यादीत त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे त्यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. याच जागेवर शिंदे गट देखील आपला हक्क सांगत आहे, मात्र त्यांचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही.
ठाकरे गटाने इतर काही जागांसाठीही उमेदवारी निश्चित केली आहे. त्यात नाशिक पश्चिममधून सुधाकर बडगुजर, मालेगाव बाह्य मधून अव्दैय हिरे, निफाड मधून अनिल कदम, नांदगाव मधून गणेश धात्रक आणि येवला मधून कुणाल दराडे यांना एबी फार्म मिळाला आहे.
सोशल मीडियावर या राजकीय घडामोडींबाबत अनेक पोस्ट फिरत आहेत, ज्यामुळे या निवडणुकांबाबतची उत्सुकता वाढली आहे.
