ठाणे: आज अनंत चतुर्दशीच्या दिवशी, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” अशा जयघोषात गणपती बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात येणार आहे. मागील दहा दिवसांपासून गणपतीची भक्तिभावाने सेवा करणाऱ्या भाविकांनी आता विसर्जनाच्या तयारीला वेग दिला आहे.परंपरागत वेशभूषेसह नाशिक ढोल, पुणेरी ढोल, लेझीम पथक यांसारख्या कार्यक्रमांची आखणी विविध गणेश मंडळांकडून केली जात आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
ठाण्यात मिरवणूक शांततेत पार पडावी म्हणून विशेष नियोजन करण्यात आले आहे.महिला सुरक्षेसाठी ठाण्यात अतिरिक्त पोलिस तैनात करण्यात आले आहेत. मिरवणुकीत महिलांची कोणतीही छेडछाड होऊ नये म्हणून ९००० पोलिस, तसेच हजारो सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे सतत नजर ठेवली जाणार आहे.
याचबरोबर वाहतुकीची कोणतीही समस्या उद्भवू नये म्हणून पोलिस आयुक्तांनी कठोर उपाययोजना आखली आहेत.