वणी शहरात शारदीय नवरात्रोत्सवास ग्रामदैवत असलेल्या जगदंबा माता मंदिरात घटस्थापना करून उत्साहात प्रारंभ झाला.देवी आज सकाळपासून विधीवत पुजा करण्यात आली तसेच मंदिराच्या गाभाऱ्यात घटस्थापना वणी पोलीस ठाण्याचे सपोनि.सुनिल पाटील सपत्नीक पुजा करून करण्यात आली .तसेच त्यांच्या हस्ते महापूजा व आरती करण्यात आली.मंदिराचे पुरोहित सुधीर दवणे यांनी करून घेतली.या वेळी मंदिरात भाविकांची दर्शनास गर्दी झाली होती.घटस्थापनेच्या पुर्व संध्येला पहिल्या माळीचा मान मराठा समाजाचा आहे. यासाठी देवीच्या महावस्त्र साजशृंगाराची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी शेकडो महिलांनी पुरूषांनी भगवे फेटे परिधान केले होते.
नवरात्रोत्सव काळात दररोज सकाळी ७ वाजता पंचामृत महापूजा सकाळी नऊ वाजता आरती, सायंकाळी सहा वाजता देवीची सवाद्य पालखी, सात वाजता महाआरती असे नियोजन आहे.
रोज घटी बसलेल्या महिलां साठी फराळाची खिचडी वाटप नियोजन केले आहे. वणी येथील परंपरे नुसार प्रत्येक माळीचा मान हा प्रत्येक समाजाला देण्यात येतो त्या नुसार रोज तो मान देऊन पुजा विधी संपन्न होतो.पालखीचा मान देशमुख व थोरात कुटुबींयाकडे असतो यावेळचा पालखीचा मान दिलीप लक्ष्मण देशमुख पंजाबराव देशमुख यांच्या कुटूंबीयांकडे आहे.दररोज रात्री ८ ते ११ या वेळेत वेगवेगळ्या विवीध धार्मिक कार्यक्रम व प्रसिद्ध देवी भागवत पुराण कथन कार्यक्रम हभप हरिदास महाराज पिंपरे हे करणार आहे. देवी भागवत कथा सोहळा याचे आयोजन नवरात्र उत्सवानिमीत्ताने करण्यात आले आहे. महानवमी ला मंदिर सभामंडपात रात्री साडेआठ वाजेपासून शतचंडी याग होईल. रात्री १२ नंतर कोहळ्याचा बळी देवून पूर्णाहूती देण्यात येणार आहे. नवरात्रोत्सवात पाच लाखांवर भाविक येण्याची शक्यता असून त्यादृष्टीने भाविकांना सोयी सुविधा पुरविणेकामी विश्वस्त,सप्तशृंगी देवी ट्रस्ट वणीचे अध्यक्ष राजेंद्र थोरात , प्रविण देशमुख, मनोज थोरात, अमोल देशमुख, लहानुबाई थोरात, पोपटराव थोरात, रमेश देशमुख, सुरेश देशमुख, गणेश देशमुख, रविंद्र थोरात, राकेश थोरात, रोशन जहागिरदार ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, पोलिस व आरोग्य प्रशासन, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.