Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ फारच चांगली, आर्थिक दृष्टया लाभ होईल

Today Rashibhavishya

सोमवार, ३ मार्च २०२५. फाल्गुन शुक्ल चतुर्थी. वसंत ऋतू. उत्तरायण. क्रोधीनाम संवत्सर. शके १९४६, संवत २०८१. राशिभविष्य

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००.

“आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस आहे” विनायकी चतुर्थी (विष्टी करण शांती, नक्षत्र गंडांत)

चंद्र नक्षत्र – अश्विनी. आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा प्लूटोशी केंद्र योग् आहे. अनुकूल शनी तुम्हाला नवीन संधी देईन. संशोधन कार्यात यश लाभेल. सखोल ज्ञान मिळवाल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. प्रलोभने टाळा. कायदेशीर सल्ला घ्या. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. आजवरच्या अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी मिळतील. मित्र मंडळी भेटतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दशम चंद्र आहे. कामाचा ताण वाढेल. नोकरीत काही चांगले अनुभव येतील. स्वप्नाळू वृत्ती उफाळून येईल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) दूरचे प्रवास होतील. मन आनंदी राहील. अडचणी दूर होतील. तीर्थयात्रा घडेल. अहंकार टाळा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) संमिश्र ग्रहमान आहे. काहीशी प्रतिकुलता आहे. गरजूना मदत करा. आरोग्यची काळजी घ्या.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) आज महत्वाची कामे पूर्ण करा. मोठी गुंतवणुक करू शकतात. व्यावसायिक प्रतिस्पर्धी माघार घेतील.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. राहत्या जागेत बदल संभवतो. प्रवासाचे नियोजन बदलेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. जुनी येणी वसूल होतील. लॉटरी लागू शकेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) मन उत्साही राहील. घरगुती कामाला प्राधान्य द्याल. संपत्ती वाढेल प्रशंसा होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) व्यवसायिक यश लाभेल. मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. अर्थकारण मजबूत होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. आज महत्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील. ज्येष्ठ व्यक्तीची काळजी वाटेल.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)