Horoscope आजचा शुभ विचार: “आज चांगला दिवस आहे.”
आजचे पंचांग:
- वार: शुक्रवार
- तारीख: २८ फेब्रुवारी २०२५
- ऋतू: वसंत
- संवत्सर: क्रोधी
- शके: १९४६, संवत २०८१
- राहू काळ: सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
- चंद्र नक्षत्र: शततारका (राहू) / दुपारी १.४० नंतर पू. भा. (गुरू)
- आज जन्मलेल्या बाळाची राशी: कुंभ
राशिभविष्य (Horoscope) – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (संपर्क – 8087520521)
मेष (Aries)
चंद्र त्रिकोण मंगळ, केंद्र गुरू आणि लाभात हर्षल आहे. ग्रहमान अनुकूल आहे. प्रापंचिक सुख लाभेल, संशोधनात यश मिळेल.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
वृषभ (Taurus)
मन आनंदी राहील. सामाजिक कार्यात भाग घ्याल. नोकरीत कामाचा जोर वाढेल. मनासारख्या घटना घडतील.
मिथुन (Gemini)
नवम स्थानातील चंद्र पुण्याईचा लाभ देईल. दबदबा वाढेल, सिद्धी प्राप्त होतील. दानधर्म करावा.
कर्क (Cancer)
चंद्र-शनी युतीमुळे संमिश्र दिवस. मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद टाळा. अनुकूल गुरू मदत करेल.
सिंह (Leo)
आत्मविश्वास वाढलेला आहे. कर्तृत्व दाखवल्यास यश मिळेल. भागीदारीत वाद टाळा. कायदेशीर सल्ला घ्या.
कन्या (Virgo)
आर्थिक लाभ होतील, पण खर्च वाढतील. आरोग्याची काळजी घ्या. कामाचा व्याप वाढेल.
तुळ (Libra)
पंचम स्थानातील चंद्र सुखद अनुभव देईल. गुंतवणुकीस अनुकूल दिवस. प्रवास यशस्वी ठरतील.
वृश्चिक (Scorpio)
मौल्यान्वित खरेदी होईल. नवीन जबाबदाऱ्या येतील. हरवलेली वस्तू सापडण्याची शक्यता.
धनु (Sagittarius)
नवीन संधी मिळतील. प्रवास होईल. मौल्यवान वस्त्र, दागिने खरेदी कराल.
मकर (Capricorn)
आध्यात्मिक लाभ होतील. कुटुंबास वेळ द्या. क्रीडा क्षेत्रात यश. राजकीय प्रगती होईल.
कुंभ (Aquarius)
चंद्र तुमच्या राशीत आहे. भेटवस्तू मिळतील. येणी वसूल होतील. नवीन मार्ग सापडतील.
मीन (Pisces)
संमिश्र दिवस आहे. आर्थिक स्थिती सुधारेल. बचतीतून लाभ होतील. दानधर्म करावा.