शके १९४६ | संवत २०८१ | क्रोधीनाम संवत्सर
चंद्रनक्षत्र: कृतिका (सूर्य)
राहुकाळ: दुपारी १२.०० ते १.३०
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Rashi Bhavishya: आजचा दिवस विशेष आहे कारण तो “वर्ज्य दिवस” मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार, काही राशींसाठी संधींचे दार उघडणार असून काहींनी मात्र सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. जाणून घ्या तुमचे दैनंदिन राशीभविष्य—
मेष (Aries) (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्र आणि बुधाच्या लाभयोगामुळे आजचा दिवस अनुकूल आहे. कलाकारांना विशेष सन्मान मिळेल, आणि अचानक आर्थिक लाभ संभवतो. सकाळच्या सत्रात शुभ कार्य करा.
वृषभ (Taurus) (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
सकाळी काही अप्रिय घटना घडू शकतात, त्यामुळे काळजी घ्या. मात्र, दुपारनंतर चंद्र राशीत येईल, त्यामुळे सकारात्मक बदल होतील. संध्याकाळी आनंददायक वातावरण लाभेल.
मिथुन (Gemini) (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
आवडत्या वस्तूची खरेदी होईल. काही सुखद अनुभव येतील. तसेच, आजचा दिवस प्रवासासाठी उत्तम आहे.
कर्क (Cancer) (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
महत्वाची कामे आजच पूर्ण करा. मित्रांकडून मदत मिळेल. व्यवसायासाठी आणि गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस आहे.
सिंह (Leo) (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
अचानक लाभ संभवतो. उच्च शिक्षणात यश मिळेल. प्रवासाच्या संधी येतील. वेळ दवडू नका, कारण दिवस प्रगतीचा आहे!
कन्या (Virgo) (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
सकाळी कामाचे नियोजन बदलावे लागू शकते. दुपारनंतर कायदेशीर बाबतीत यश मिळण्याची शक्यता आहे.
तुळ (Libra) (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
संमिश्र दिवस आहे. भलते धाडस टाळा. मेहनत अधिक लागेल, पण आर्थिक लाभ होतील.
वृश्चिक (Scorpio) (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
व्यवसाय वाढेल. आर्थिक फायदा संभवतो. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. प्रवास घडतील.
धनु (Sagittarius) (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
संमिश्र दिवस आहे. वाहन सौख्य लाभेल. पाळीव प्राण्यांशी संबंधित व्यवसाय किंवा गुंतवणूक फायदेशीर ठरेल.
मकर (Capricorn) (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
लेखक आणि कलाकारांसाठी यशाचा दिवस आहे. तुमच्या स्पर्धकांवर विजय मिळवाल. समाजात तुमचा दबदबा वाढेल.
कुंभ (Aquarius) (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
प्रवासी योजनांमध्ये यश मिळेल. वक्तृत्व चमकेल. आर्थिक दृष्टिकोनातून चांगला दिवस आहे.
मीन (Pisces) (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
आज तुमच्या राशीत बुध, शुक्र आणि राहू आहेत. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ शकते. प्रलोभने टाळा आणि विवेकी निर्णय घ्या.
कुंडली मार्गदर्शन आणि राशीअनुसार सल्ला हवे आहे?
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी (नाशिक) यांच्याशी 8087520521 या क्रमांकावर संपर्क साधा. व्यक्तिगत भविष्य, करिअर, विवाह, व्यवसाय मार्गदर्शनासाठी बुकिंग सुरू आहे!