१० एप्रिल २०२५ – महावीर जयंती आणि प्रदोषचा शुभ संगम: आजचा दिवस तुमच्या राशीला काय घेऊन आलाय?
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Rashibhavishya आजचा गुरुवार, १० एप्रिल २०२५ — चैत्र शुक्ल त्रयोदशी — एक अत्यंत शुभ योग घेऊन आलेला दिवस आहे. वसंत ऋतू आणि उत्तरायण काळातील हा दिवस प्रदोष व्रत आणि महावीर जयंतीसारख्या विशेष पर्वांनी सजलेला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज वृद्धी योग असून, पूर्वा फाल्गुनी व उत्तर फाल्गुनी नक्षत्रांचे संयोग आहे. विशेष म्हणजे संध्याकाळी ७.०५ नंतर जन्मलेले बाळ कन्या राशीचे असणार आहे.
आजचा राहुकाळ – दुपारी १.३० ते ३.०० या वेळेत काहीही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा.
Rashibhavishya:
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी (नाशिक) यांच्या मार्गदर्शनानुसार आजचे राशीभविष्य काही महत्त्वाचे संकेत देत आहे:
- मेष राशीच्या लोकांनी सरकारी कामात दक्षता ठेवावी.
- वृषभ राशीसाठी आज अचानक लाभाचे योग आहेत.
- मिथुन ला कामात यश, पण व्याप वाढेल.
- कर्क राशीसाठी प्रवासाचे संकेत.
- सिंह व कन्या राशीला संयमाची गरज.
- तुळ राशीला व्यवसायात यश, पण संध्याकाळी सावध.
- वृश्चिक साठी प्रतिष्ठा वाढ, पण आरोग्याची काळजी.
- धनु ला सामाजिक कार्यात संयम गरजेचा.
- मकर ला वारसा वादापासून जपावं लागेल.
- कुंभ राशीसाठी स्पर्धात्मक यश.
- मीन साठी खर्च वाढ, पण आयही वाढेल.
विशेष टीप: “तुमचे नाव आणि राशी जुळतीलच असे नाही.