Today’s Horoscope, February 22, लक्ष्मी योगाचा शुभ संयोग ! मिथुन, सिंहसह या राशींसाठी शानदार ‘शनिवार’ ! जाणून घ्या, तुमचे राशिभविष्य

Today Rashibhavishya

Rashi Bhavishya 22 February 2025 Today Horoscope in Marathi : राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

“आज संध्याकाळी ६.०० नंतर चांगला दिवस आहे” श्री रामदास नवमी

Aaj Che Rashi Bhavishya 22 February 2025

नक्षत्र – ज्येष्ठ/(संध्याकाळी ५.४० नंतर)मूळ. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक/ (संध्याकाळी ५.४० नंतर) धनु. (हर्षण योग शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा शनी आणि नेपच्यूनशी केंद्र योग आहे. फारशी अनुकूलता नाही. सांभाळून पावले टाका. महत्वाचे करार आज नकोत.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) मन उदास राहील. सामाजिक कार्य करताना काळजी घ्या. विनाकारण प्रसिद्धीच्या मागे लागू नका. शत्रू वाढतील.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. मात्र मोठी जोखीम नको. मौल्यवान वस्तू सांभाळा. पत्नीशी नाते सांभाळा.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारसे धाडसी निर्णय घेऊ नका. बोलताना काळजी घ्या. दानधर्म कराल. उत्तरार्ध आर्थिक लाभाचा.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज संमिश्र दिवस आहे. भेटवस्तू मिळतील. आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. कामानिमित्त प्रवास करावे लागतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. नवीन खरेदी होईल. संध्याकाळ घरगुती कामासाठी राखून ठेवा.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. कामे रेंगाळतील. आध्यत्मिक लाभ होतील. पैशांची व्यवस्था होईल. उत्तरार्ध व्यावसायिक कामासाठी धावपळीच्या असेल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अहंकार टाळा. आज गोड बोलून कामे होऊ शकतात. व्यसने टाळा. प्रलोभनांपासून दूर रहा.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज फारशी अनुकूलता नाही. अनामिक भय वाटेल. कामात फारसा उत्साह जाणवणार नाही. योग्य प्रतिसाद मिळणार नाही.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल सुरुवात आहे. मन आनंदी राहील. कष्टाचे उत्तम फळ मिळेल. उत्तरार्ध विश्रांती घ्यायला लावणारा असेल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) संमिश्र दिवस आहे. कामाचा ताण वाढेल. कठोर मेहनत घ्यावी लागेल. उत्तरार्ध मात्र सुखद अनुभव देणारा असणार आहे.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) सुरुवातीला नववा चंद्र काही सुखद घटना अनुभवास देईन. आर्थिक बळ वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. संध्याकाळ कामानिमित्त धावपळ करायला लावणारी ठरेल.

सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521.