शिर्डी – भाजप नेते वसंतराव देशमुख यांच्या आक्षेपार्ह विधानावरून राजकीय वातावरण तापले आहे. या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध करत सुजय विखेंच्या मातोश्री शालिनीताई विखे पाटील आक्रमक झाल्या आहेत. “चांगले काम काही लोकांना पाहवत नाही, म्हणून ठराविक मंडळी विघ्न आणण्याचे काम करत आहेत. देशमुख यांनी केलेल्या खालच्या पातळीवरील वक्तव्याचा आम्ही जोरदार विरोध करतो,” असे त्यांनी ठणकावून सांगितले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
शालिनीताई पुढे म्हणाल्या, “सहनशीलतेलाही काही मर्यादा असतात. सुजयचे भाषण नेहमी मुद्देसूद असते आणि आम्ही त्याला योग्य संस्कार दिले आहेत. डोक्यावर पडला म्हणून कोणीही आरोप करतो, पण कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही.” तसेच, त्यांनी इशारा दिला की, “जर कोणी खालच्या पातळीवर बोलेल, तर सुजय तसाच प्रत्युत्तर देईल. आम्ही कुणीही बांगड्या भरलेल्या नाही, ठोशासठोश देण्याची तयारी आमच्यात आहे. लोणी गावात कोणत्याही चुकीच्या गोष्टींचा प्रयत्न झाल्यास आम्ही तो सहन करणार नाही.