शिवजयंती निमित्ताने विकी कौशलचा रायगड दौरा
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Vicky kaushal: अभिनेता विकी कौशल (Vicky kaushal) याने शिवजयंतीचे औचित्य साधून किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन त्याने दर्शन घेतले आणि नतमस्तक झाला. यावेळी रायगडावर हजारोंच्या संख्येने शिवभक्त आणि चाहत्यांनी गर्दी केली होती.

ढोल ताशांच्या गजरात विकी कौशलचे (Vicky kaushal) स्वागत
शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर विकी कौशलने कालच रायगडावर येणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज सकाळी तो पाचाड येथे दाखल झाला आणि रोप वे मार्गाने गडावर गेला. गडावर पोहोचल्यानंतर ढोल-ताशांच्या गजरात त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

राज्यसदरेवर शिवपुतळ्याचे दर्शन
रायगड किल्ल्यावर विकी कौशलने (Vicky kaushal) राज्यसदरेवर जाऊन मेघडांबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले आणि महाराजांना अभिवादन केले. या प्रसंगी त्याच्यासोबत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, “छावा” सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आणि संपूर्ण चित्रपट टीम उपस्थित होती.

छावा सिनेमाच्या चाहत्यांची मोठी उपस्थिती
“छावा” चित्रपटात संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलला पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवभक्त आणि चित्रपटाचे चाहते उपस्थित होते. त्याच्या आगमनाने रायगडावर मोठा उत्साह निर्माण झाला होता. शिवजयंतीनिमित्ताने रायगडावर घडलेल्या या ऐतिहासिक क्षणाने शिवप्रेमींमध्ये नवचैतन्य संचारले आहे.

विकी कौशलचा रायगड दौरा – मुख्य मुद्दे:
- शिवजयंती निमित्ताने विकी कौशलचा किल्ले रायगडावर दौरा
- महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन
- ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत
- राज्यसदरेवर जाऊन मेघडांबरीतील शिवपुतळ्याचे दर्शन
- राज्य मंत्री आदिती तटकरे आणि “छावा” चित्रपट टीमची उपस्थिती
- हजारोंच्या संख्येने शिवभक्त आणि चाहत्यांचा जल्लोष
विकी कौशलचा हा ऐतिहासिक दौरा आणि शिवभक्तांनी दाखवलेला प्रेमभाव भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

सर्व फोटो अभिनेता विकी कौशल्य यांच्या इन्स्टाग्रामवरचे आहे.