नाशिक: विडी कामगारनगर खून (Khun) प्रकरणातील पाच पाहिजे आरोपींना जेरबंद करत गुन्हे शाखा युनिट-१ ने मोठे यश मिळवले आहे. आरोपींना पकडण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या विशेष पथकाने वेगवेगळ्या ठिकाणी शोधमोहीम राबवून आरोपी ताब्यात घेतले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
आडगाव पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा क्रमांक ३४५/२०२४ नोंदवण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी नाशिक (Nashik) शहराचे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक, उपआयुक्त प्रशांत बच्छाव, आणि सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-१ ला आदेश देण्यात आले होते.
पोलीस अंमलदार विलास चारोस्कर यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, आरोपी नगरसुल (ता. येवला) येथे लपून बसले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राजापुर रोड, पिंपळखुटे (ता. येवला) येथे सापळा रचला. येथे सुरज रविंद्र मोहीते (वय २२), रविंद्र साहेबराव मोहीते (वय ४३), व एका महिलेचा समावेश असलेल्या तीन आरोपींना अटक करण्यात आली.
पोलिस अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीनुसार, आणखी दोन आरोपी जैन मंदिर, विल्होळी येथे येणार असल्याचे कळाले. पथकाने विल्होळी परिसरात शोधमोहीम राबवून मच्छिंद्र उत्तम जाधव (वय ३८) आणि एका महिला आरोपीला ताब्यात घेतले.
ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड, सपोनि हेमंत तोडकर, चेतन श्रीवंत, महेश साळुंके, नितीन जगताप, विलास चारोस्कर, तसेच महिला पोलीस कर्मचारी अनूजा येलवे, मनीषा सरोदे आणि त्यांच्या टीमने या मोहिमेत मोलाचे योगदान दिले.
पाचही आरोपींना पुढील चौकशीसाठी आडगाव पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हे पण वाचा दारूमध्ये झोपेच्या गोळ्या टाकून मित्राचा खून.. संशयित अटकेत; गुन्हे शाखेच्या पथकाची कारवाई”..चा