हरियाणातील प्रसिद्ध महिला कुस्तीपटू विनेश फोगाटने आपल्या राजकीय पदार्पणातच उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जिंदच्या जुलाना विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदाच निवडणूक लढवताना तिने भाजपचे उमेदवार कॅप्टन योगेश बैरागी यांचा 6005 मतांनी पराभव केला. सुरुवातीला मागे पडलेल्या फोगाटने आपल्या प्रतिकूल परिस्थितीतून सावरत विजय संपादन केला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मतांची आकडेवारी:
विनेश फोगाटला एकूण 65,080 मते मिळाली, तर भाजपचे कॅप्टन योगेश बैरागी यांना 59,065 मते मिळाली. आम आदमी पक्षाच्या उमेदवार कविता राणी यांना केवळ 1,280 मते मिळाली, ज्यामुळे त्यांचा या निवडणुकीत फारसा प्रभाव दिसून आला नाही.
फोगाटचा विजय का महत्त्वाचा आहे?
विनेश फोगाटचा हा विजय फक्त एका विधानसभा जागेपुरता मर्यादित नाही. प्रसिद्ध कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटले, “देश की बेटी विनेश फोगाट को जीत की बहुत बहुत बधाई। यह लड़ाई सिर्फ़ एक जुलाना सीट की नहीं थी, सिर्फ़ 3-4 और प्रत्याशियों के साथ नहीं थी, सिर्फ़ पार्टियों की लड़ाई नहीं थी। यह लड़ाई देश की सबसे मज़बूत दमनकारी शक्तियों के ख़िलाफ़ थी। और विनेश इसमें विजेता रही।”
विनेश फोगाटची निवडणुकीतील कामगिरी – राजकारणातील नवा चेहरा:
विनेश फोगाटचा राजकीय पदार्पण अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे. कुस्तीच्या आखाड्यात यश मिळवल्यानंतर, आता तिने राजकारणात देखील आपली छाप सोडली आहे. जुलाना मतदारसंघातील हा विजय तिला राजकारणातील भविष्यासाठी नवी दिशा देईल.