Shocking Viral threat video case : व्हिडीओने उडवली खळबळ – रिक्षाचालकाच्या बदनामीचा कट

Viral threat video case

नवीन संघटना स्थापन केल्याच्या वादातून प्रकार

Viral threat video case : पेठरोडवरील आरटीओ कार्यालय परिसरात एका रिक्षाचालकास जातीवाचक शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी चार जणांविरुद्ध अ‍ॅट्रॉसिटीसह विविध कलमांखाली पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

संशयितांनी सोशल मीडियावर व्हिडीओ करून बदनामी (Viral threat video case)

पीडिताची पोलीसात फिर्याद

संथानाच्या वादातून झालेल्या या प्रकारात योगेश कायस्थ, नितीन रेवगडे, जितेंद्र भाभे (भावे) आणि चेतन शेवाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान रमेश आहिरे (रा. शिवाजीनगर, सातपूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक ९ फेब्रुवारी रोजी ते आरटीओ कार्यालय परिसरात गेले असताना दुपारी योगेश कायस्थ व नितीन रेवगडे यांनी त्यांच्यावर जातीवाचक शब्दप्रयोग करीत “नवीन संघटना काढून लोकांना लुटता” असा आरोप करत टोमणे मारले.

कॉलर पकडून दमदाटी आणि अपशब्द

त्यावर जाब विचारण्याचा प्रयत्न केला असता, योगेश व नितीन यांनी त्यांच्या कॉलरला धरून धमकावले. जितेंद्र भावे याने अपशब्द वापरून शिवीगाळ केली. यानंतर त्या दिवशीच संशयितांनी सोशल मीडियावर बदनामीकारक व्हिडीओ व्हायरल केला. चेतन शेवाळे यानेही सोशल मीडियावर आहिरे यांची बदनामी करीत जीवे मारण्याची धमकी दिली.

पोलीस तपास सुरू

या सर्व प्रकारामुळे घाबरलेल्या आहिरे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, सहाय्यक आयुक्त पदमजा बढे या प्रकरणाचा तपास करत आहेत.