हिवाळ्यात पाठदुखीचा त्रास जाणवतो. या वेदनेमुळे उठणे-बसणे, अगदी झोपणेही कठीण होऊन बसते. जे लोक ऑफिसमध्ये किंवा घरी एकाच ठिकाणी बराच वेळ बसून राहणाऱ्यांना शरीराच्या वेगवेगळ्या भागात वेदना होतात. आहारात पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे ही समस्या उद्भवते.अशा परिस्थितीत काही टिप्स,ज्याचा वापर करून तुम्ही पाठदुखी पासून सुटका करून घेऊ शकता.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
एक कपापेक्षा जास्त पाणी घ्या आणि ते गरम करून घ्या.आल्याचे बारीक तुकडे करा आणि ते पाण्यात मिसळून उकळून गाळून घ्या. चवीसाठी तुम्ही या चहामध्ये मध टाकू शकता. हे प्यायल्याने पाठदुखीपासून आराम मिळतो. हा आल्याचा चहा प्यायल्याने पाठदुखीपासून आराम मिळण्याची शक्यता असते.
हळदीचे दूध
हळदीचे दूधही (Turmeric Milk) पाठदुखीवर फायदेशीर ठरू शकते. मात्र हिवाळ्यात दूध पिण्याबाबत अनेक मतंमतांतरे आहेत.
शारीरीक हालचाल करा
एका जागी जास्त वेळ बसल्याने किंवा पडून राहिल्याने पाठदुखीचा त्रास जास्त जाणवतो. त्यामुळे हा त्रास जाणवू नये म्हणून हालचाल करायला हवी. विशेष म्हणजे बसून काम करणाऱ्यांनी दर 2 ते 3 तासांनी हालचाल करावी. शक्य तितकी कामे बसून करण्याऐवजी उभ्या राहून
पाठदुखी (Back pain) ही महिला व पुरुषांमध्ये एक सामान्य समस्या आहे. अनेकांना पाठदुखीच्या इतक्या वेदना होतात की त्यातून त्यांना काही दिवसांसाठी कामापासून दूर रहावे लागते, अनेक व्यायाम, उपचार करुनही पाठदुखीची समस्या पाठ सोडत नाही. ऑफिसमध्ये (office) तासन्तास काम केल्याने आणि सतत एकाच ठरावीक पध्दतीने बसल्याने पाठदुखी होत असते. थोडेसे वाकले तरी पाठीला अत्यंत वेदना होत असता. 8 ते 9 तासांच्या ऑफिस वर्कमुळे अनेकांना पाठदुखी होत असते. पाठदुखी ही सामान्य समस्या असल्याने अनेक लोक याकडे दुर्लक्ष करीत असतात. परंतु दीर्घकाळापर्यंत (long time) चालणारी पाठदुखीची समस्या तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. यावर काही उपाय आहेत, त्यामुळे पाठदुखीची समस्येपासून आराम मिळू शकतो.
पाठदुखीची काय आहेत कारणे
जास्त वेळ एकाच प्रकारे बसणे, शरीराची हालचाल न करणे, वजन जास्त असणे किंवा व्यायाम न करणे यामुळे लोकांना पाठदुखीचा त्रास होतो. खेळताना किंवा प्रवास करताना वारंवार धक्के बसल्यानेही अनेक वेळा पाठीच्या कण्याला त्रास होतो ज्यामुळे पाठदुखी होते. जास्त मानसिक ताण आणि थकवा यांमुळे आपल्या पाठीचे स्नायू ताणले जातात, ज्यामुळे पाठदुखी होते. अनेक वेळा लोक रात्री झोपताना पाय दुमडून झोपतात. यातूनही पाठदुखीची समस्या निर्माण होत असते.
पाठीचा कणा ताठ ठेवा
चालताना किंवा बसताना, पाठ सरळ ठेवा, यामुळे तुमचा पाठीचा कणा ताठ राहतो. वाकून बसल्याने पाठदुखीची समस्या निर्माण होत असते. विशेषतः ऑफिसमध्ये जास्त वेळ घालवत असलेल्या व्यक्तींनी बसताना पाठ नेहमी सरळ ठेवली पाहिजे. तसेच कार्यालयात काही वेळानंतर फेरी मारत पुन्हा कामाला सुरुवात केली पाहिजे.
व्यायाम करताना वाकणे टाळावे
अनेक लोक पाठीचे दुखणे जाण्यासाठी तसेच शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करतात. परंतु ज्याना पाठीचे दुखणे आहे अशा लोकांनी काही व्यायाम टाळायला हवे, वाकून व्यायाम करणे तुमची पाठदुखी अजूनच वाढवू शकते. त्यामुळे असे व्यायाम न केलेले बरे असतात.
सलग काम करु नका
काहींना कामाचा इतका ताण असतो की, त्यामुळे ते संपूर्ण वेळ फक्त कामच करीत असतात. काही क्षणाचीही उसंत घेत नाही. त्यामुळे सतत बसून असल्यामुळे पाठीचे दुखणे लागू शकते. त्यामुळे कामात काही वेळाची विश्रांती आवश्यक असते. कामांत किमान एक तासाच्या अंतराने ब्रेक घेणे आवश्यक आहे. जर तुम्ही कुठे बाहेर जाऊ शकत नसाल तर तुमच्या ऑफिसमध्येच एक फेरी मारा व पुन्हा कामाला लागा.
जड वस्तू उचलू नका
कोणतीही जड वस्तू उचलू नका. जर एखादी जड वस्तू उचलायची असेल तर आधी गुडघे वाकवून मग ती वस्तू उचलावी. असे केल्याने सर्व भार कंबरेवर जाण्याऐवजी गुडघ्यावर येईल, तसेच अवजड कामे करताना कुणाचीतरी मदत नक्की घ्या, यातून सर्वच भार तुमच्यावर येणार नाही.
सकस आहाराचा समावेश करा
पाठदुखीसह अन्य दुखणे मुळापासून नष्ट करण्यासाठी आपल्या रोजच्या जेवणात सकस आहाराचा समावशे करणे गरजेचे आहे. व्हिटॅमिन डी 3, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शियम, फॉस्फरस, हिरव्या भाज्या खाल्ल्याने पाठदुखीमध्ये आराम मिळतो. जर तुम्ही मांसाहार करू शकत असाल तर आहारात माशांचा नक्कीच समावेश करा. यातून आपली हाडे मजबूत होत असतात.