राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाबाहेर एका महिलेने तोडफोड केल्याच्या घटनेने राजकीय वातावरण तापले आहे. या संदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी या प्रकरणाची सखोल माहिती घेण्याचे आश्वासन दिले आहे. , “त्या महिलेची काही व्यथा असेल तर ती समजून घेतली जाईल. तिच्या मागण्या जाणून घेतल्या जातील आणि योग्य ते समाधान करण्यात येईल.”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
विरोधकांनी या घटनेवरून टीका करत ‘लाडकी बहीण चिडली’ असा टोला लगावला आहे. त्याला प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी सांगितले, “विरोधकांकडे आता मुद्दे राहिलेले नाहीत, म्हणूनच अशा घटनांचा वापर केला जात आहे. परंतु मी खालच्या स्तरावर उतरून प्रतिसाद देणार नाही. एखादी बहीण चिडली असेल, तर तिची व्यथा समजून घेण्याची आपली जबाबदारी आहे. ती जाणून घेतल्यावर योग्य निर्णय घेतला जाईल.”