युवा सेनेचा मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीत दणदणीत विजय, सर्व १० जागांवर यश

Yuva Sena's Resounding Victory in Mumbai University Senate Elections, Wins All 10 Seats

आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवा सेनेने मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत अभूतपूर्व यश मिळवले असून, सर्व १० जागा जिंकून ठाकरेंच्या शिवसेनेत उत्साहाची लाट निर्माण केली आहे. या निवडणुकीत युवा सेनेने भाजप प्रणित अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) पराभव केला आहे, ज्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या गटाचे मनोबल उंचावले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

या निवडणुकीत ७२०० पैकी ६६८४ मतपत्रिका वैध ठरल्या होत्या. एकूण २८ उमेदवारांमधून १० उमेदवार निवडून आले. महिल प्रवर्गातून स्नेहा गवळी, एससी प्रवर्गातून शीतलशेठ देवरुखकर, ओबीसी गटातून मयूर पांचाळ, एसटी प्रवर्गातून धनराज कोहचडे, एनटी प्रवर्गातून शशिकांत झोरे, आणि खुल्या प्रवर्गातून प्रदीप सावंत, मिलिंद साटम, परम यादव, किसन सावंत, व अल्पेश भोईर यांनी विजय मिळवला. या उमेदवारांना पाच हजारांहून अधिक मते मिळाली, तर अभाविपच्या उमेदवारांना साधारणपणे हजार मते मिळाली.

युवा सेनेच्या या विजयामुळे ठाकरे गटाच्या आगामी निवडणुकीतील संभावनांना एक नवीन ऊर्जा मिळाली आहे.

Leave a Reply