
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक शहरातील दीड दिवसाचे गणपती विसर्जन,नाशिक महानगरपालिकेच्या वतीने
मूर्ती संकलन करण्यात आले. आकडेवारी पुढील प्रमाणे
नाशिक पूर्व विभागात एकूण -४५ मूर्ती संकलित करण्यात आल्या.
नवीन नाशिक विभागात एकूण- ०८ मूर्ती संकलित,
सातपूर विभागात एकूण- ४६ मूर्ती संकलित केल्या,
नाशिक पश्चिम विभागातील दीड दिवसाच्या गणपतीच्या , लक्ष्मीनारायण घाट येथील व संगम घाट येथील असे सर्व एकूण ५९
नाशिकरोड विभागात ०५ मुर्त्या संकलित करण्यात आल्या
सीता सरोवर गणपती बाप्पा संख्या ५६ मूर्ती, रामकुंड येथे २३ मूर्ती संकलित करण्यात आल्या.
गणेश भक्तांनी दीड दिवसाचे गणपती विसर्जन करून मनपा पर्यावरण विभागाच्या आवाहनाला प्रतिसाद देत एकूण २४२ मूर्तीदान केल्या.
गणेशोत्सव काळात मूर्ती दान करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ अशोक करंजकर, पर्यावरण उपायुक्त अजित निकत यांनी केले आहे.