नाशिकच्या पाथर्डी गावातील थरारक घटना
नाशिक: पत्नीच्या अनैतिक संबंधांचा संशय घेत ४२ वर्षीय व्यक्तीने कोयत्याने ४० वर्षीय नरपतसिंग गावित यांचा निर्घृण खून (Murder) केला. ही घटना पाथर्डी गावातील दाढेगाव रोडवर ६ डिसेंबर २०१९ रोजी घडली. या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेप आणि २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
४२ वार करून निर्दयी हत्या
विठ्ठल मोहन गव्हाणे (४२, रा. दाढेगाव रोड, पाथर्डी गाव) याला नरपतसिंग गावित यांच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. रागाच्या भरात त्याने कोयत्याने नरपतसिंगवर तब्बल ४२ वार करत त्यांचा खून (Murder ) केला.
या प्रकरणाचा तपास इंदिरानगर पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक पी. टी. पाटील यांनी केला. सरकारी पक्षातर्फे ॲड. पंकज चंद्रकोर यांनी जोरदार युक्तिवाद केला. विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी महत्त्वाचे साक्षीदार तपासले.
Murder प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फितूर; न्यायालयाचे कठोर आदेश
या खटल्यात कृष्णा बरसतीलाल कनोजिया हा प्रमुख प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होता. मात्र, न्यायालयात साक्ष देताना तो फितूर झाला. परिस्थितिजन्य पुराव्यांमुळे आरोपी दोषी ठरला असला तरी, न्यायालयाने कनोजियाविरोधात सीआरपीसी कलम ३४४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
गुन्हा फितूर साक्षीदारावरही
सीआरपीसी कलम ३४४ नुसार फितूर साक्षीदाराला ६ महिने ते १ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.
पत्नीला नुकसानभरपाई मिळणार
न्यायालयाने नरपतसिंग गावित यांच्या पत्नी रविता गावित यांना विधी सेवा प्राधिकरणामार्फत नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत.
या प्रकरणात काम पाहणारे अधिकारी:
- पैरवी अधिकारी: पोलिस हवालदार सुधाकर गायकवाड
- श्रेणी उपनिरीक्षक: आय. एस. पिरजादे
- सहायक उपनिरीक्षक: दिनकर खैरनार
न्यायालयाचा कठोर संदेश
हा खटला न्यायसंस्थेने साक्षीदार फितूर झाल्यानंतरही परिस्थितिजन्य पुराव्यांवर निकाल दिल्याचे उदाहरण ठरला. तसेच फितूर साक्षीदाराविरोधात कारवाईचे आदेश देऊन न्यायालयाने गुन्हेगारी न्यायप्रक्रियेत सत्य महत्त्वाचे आहे, हा संदेश दिला आहे.