: मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील अंतरवाली मराठी येथे पुन्हा उपोषणाला बसले असल्याने त्यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून अहमदनगर जिल्ह्याच्या शेवगाव तालुक्यातील सोनेरी येथील परशुराम महाराज विखे यांनी बोधेगाव येथील मारुती मंदिरासमोर आमरण उपोषण सुरू केले असून भातकुडगाव फाटा येथे चंद्रकांत महाराज लबडे दोन दिवसापासून आमरण उपोषणास बसले आहेत यावेळी शेवगावचे तहसीलदार, पोलीस प्रशासन, यांना निवेदन देण्यात आले.मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला जोर मिळावा आणि शासनाने यावर तत्काळ कार्यवाही करावी, या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतला आहे.उपोषणाच्या ठिकाणी मराठा समाजाचे कार्यकर्ते व स्थानिक नागरिकांची मोठी गर्दी जमली असून, बालमटाकळी येथील सरपंच राम बामदळे , उपसरपंच सर्जेराव घोरपडे, ग्रामपंचायतचे सदस्य बोधेगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य नितीन काकडे, सरपंच महादेव घोरतळे, मराठा बांधव व मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते त्यांच्या उपोषणास पाठिंबा देत आहेत. शेवगाव परिसरातूनही आंदोलनाला व्यापक पाठिंबा मिळत आहे. परशुराम महाराज विखे सोनेरी यांनी सांगितले की, “मराठा समाजाच्या हक्कांच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू असून, जोपर्यंत सरकार योग्य निर्णय घेत नाही, तोपर्यंत उपोषण थांबणार नाही.”या आंदोलनामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चेचे वातावरण तापले असून, राज्यभरात त्याचे परिणाम उमटू शकतात.
पांडुरंग निंबाळकर
अहमदनगर शेवगाव
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.