मौजमजेसाठी अल्पवयीन मुलांनी चोरल्या ११ मोटारसायकली पोलिसांनी केल्या हस्तगत

**For Fun, Juveniles Stole 11 Motorcycles; Police Recover Stolen Vehicles**

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात मौजमजेच्या उद्देशाने चोरलेल्या तब्बल ११ मोटारसायकली म्हसरूळ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी हस्तगत केल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांनी अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, त्यांच्या चौकशीतून चोरलेल्या वाहनांचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांमुळे पोलीस आयुक्त संदिप कर्णिक यांनी कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या सूचनेनुसार, पोलीस उप आयुक्त परिमंडळ-एक किरणकुमार चव्हाण आणि सहा. पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्रीमती पदमजा बढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे यांच्या पथकाने पेठ रोडवर पेट्रोलिंग दरम्यान दोन संशयास्पद अल्पवयीन मुलांना मोटारसायकलवर जाताना पाहिले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला, मात्र मुलांनी पळ काढला. अखेर एसटी वर्कशॉपजवळ त्यांना अडवून चौकशी केली असता, त्यांच्याकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याचे आढळले. मोटारसायकलच्या चेसिस आणि इंजिन क्रमांकांची तपासणी केल्यानंतर ती म्हसरूळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या चोरीच्या प्रकरणातील असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीत मुलांनी पालकांच्या उपस्थितीत गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, मौजमजेच्या हेतूने त्यांनी मोटारसायकल चोरी करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी चार ते पाच साथीदारांच्या मदतीने म्हसरूळ, पंचवटी, उपनगर, आणि भद्रकाली परिसरातून मोटारसायकल चोरी केल्या. चोरी केलेल्या वाहनांच्या नंबर प्लेट्स काढून त्यांचा वेगवेगळ्या ठिकाणी वापर केला जात होता.

म्हसरूळ पोलिसांनी एकूण ११ मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत, ज्यापैकी ४ म्हसरूळ पोलीस ठाण्यातील, २ पंचवटी, २ उपनगर, आणि १ भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी झालेल्या आहेत.

Leave a Reply