Mahayuti : महायुतीचा पत्रकार परिषदेत विकासाची खात्री; देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली

Mahayuti press conference

मुंबई: महायुतीने आज पत्रकार परिषद आयोजित करून महाराष्ट्राचा विकास साधण्यासाठी आपले रिपोर्टकार्ड सादर केले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सरकारच्या योजना आणि विरोधकांच्या आश्वासनांवर भाष्य केले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “राज्यात निवडणुकींचा शंखनाद झाला आहे.” त्यांनी विरोधकांच्या आरोपांवर कठोर टीका करताना विरोधक एका बाजूला राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत असे सांगतात, तर दुसऱ्या बाजूला कर्जमाफीच्या मोठ्या घोषणा करतात. “तुम्हाला आधी ठरवावे लागेल की सरकारकडे योजनांसाठी पैसे आहेत का? पैसे असतील तर कर्जमाफी करता येईल,” असे फडणवीस म्हणाले.

यावेळी त्यांनी “लाडकी बहीण” योजनेबद्दल माहिती दिली. त्यांनी ठामपणे स्पष्ट केले की या योजनेवर कोणताही धक्का लागणार नाही आणि ती कायमस्वरूपी राहील. “आम्ही ज्या योजना जाहीर केल्या आहेत, त्या पूर्ण आर्थिक पाठबळ उभा करूनच जाहीर केल्या आहेत,” असे त्यांनी सांगितले.

पत्रकार परिषदेत शरद पवार यांना उद्देशून फडणवीस यांनी आव्हान दिले, “तुमचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण आहे, हे सांगा.” यावर एकनाथ शिंदे म्हणाले, “आमच्याकडे मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा नाही. आमचे कार्यच आमचा चेहरा आहे.”

फडणवीस यांनी जागावाटपाच्या प्रक्रियेमध्ये प्रगती झाल्याचे सांगितले, “आम्ही अंतिम टप्प्यात आहोत. योग्य जागा निश्चित केल्यानंतर तुम्हाला याबाबत माहिती देऊ.”

महाविकास आघाडीच्या नेत्यांनी महायुतीच्या या पत्रकार परिषदेला कडवा प्रतिसाद दिला आहे. विरोधकांनी फडणवीस आणि शिंदे यांच्यावर आरोप केले आहेत की, ते केवळ आपल्या राजकीय हितसंबंधांसाठी काम करत आहेत.