दिल्ली: महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली. या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना पटोले म्हणाले, “मी कोणताही राजीनामा दिलेला नाही. राजीनाम्याच्या चर्चा फक्त अफवा आहेत. महाराष्ट्रातील निवडणूक निकालांवर पक्ष नेतृत्वासोबत चर्चा करण्यासाठी आलो आहे.”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पटोले पुढे म्हणाले की, “आम्ही लवकरच मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची भेट घेऊन पराभवाची सखोल कारणमीमांसा करणार आहोत.”
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या जागांमध्ये घट झाली होती. त्यामुळे राजीनाम्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, पटोले यांनी स्पष्टपणे सांगितले की, ते केवळ नेतृत्वाशी संवाद साधण्यासाठी आले आहेत.
दरम्यान, उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “राज्यातील पराभव ही सामूहिक जबाबदारी आहे. यासाठी एकट्या पटोलेंना दोषी ठरवता येणार नाही. त्यामुळे त्यांना राजीनामा देण्याची गरज नाही.”
काँग्रेस पक्ष आता पराभवाच्या कारणांवर विचारमंथन करीत पुढील पावले उचलण्याच्या तयारीत आहे.