नाशिकः लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात Onion कांद्याच्या रात घसरणीची गंभीर बाब मांडली आहे. सध्या लासलगाव बाजारात दररोज ४५ ते ५० हजार क्विंटल कांद्याची आवक होत आहे, ज्यामुळे सात दिवसांत कांद्याचे दर ५६ टक्क्यांनी घसरले आहेत. मागील आठवड्यात ३६०० रुपये प्रति क्विंटल असलेले कांद्याचे दर गुरुवारी १६०० रुपयांपर्यंत खाली आले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
लासलगाव बाजार समितीने या स्थितीला जबाबदार ठरवलेल्या कांद्याच्या अत्यधिक आवक आणि मागणीतील असमतोलावर उपाय योजनेची मागणी केली आहे. पुढील काळात कांद्याची आवक अधिक वाढण्याची शक्यता आहे, आणि असे झाले तर दर आणखी कमी होण्याची भीती व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांचा नुकसान टाळण्यासाठी कांदा निर्यातीवरील २० टक्के शुल्क कमी करण्याची किंवा पूर्णपणे हटविण्याची आवश्यकता असल्याचे बाजार समितीचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले आहे.
Onion : कांद्याच्या दरात ५६ टक्क्यांची घसरण, शेतकऱ्यांचे आंदोलन; निर्यातीवरील शुल्क कमी करण्याची मागणी
शेतकऱ्यांनी या घसरणीविरोधात गुरुवारी लासलगाव बाजार समितीत लिलाव बंद पाडला आणि केंद्र सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. शेतकऱ्यांचा आरोप आहे की, निर्यात शुल्कामुळे भारतीय कांद्याच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्पर्धात्मकता कमी झाली आहे, ज्यामुळे देशांतर्गत कांद्याचे दर स्थिर राहण्यात अडचण निर्माण होत आहे.
शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिक जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी तातडीने निर्यातीवरील शुल्क माफ करण्याची मागणी केली आहे. बाजार समितीने सांगितले की, कांद्याच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय कांद्याची स्पर्धात्मकता वाढेल आणि देशांतर्गत भाव स्थिर राहतील.
He pan wacha : Lasalgaon : कांद्याच्या दरात मोठी घसरण; शेतकरी चिंतेत