Nashik : नाशिकरोड (प्रतिनिधी): नाशिकरोड पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका दुचाकी चोरट्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पाच चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. चोरी गेलेल्या दुचाकी मालकांसाठी ही नवीन वर्षाची आनंदवार्ता ठरली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई अजय देशमुख आणि नाना पानसरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पवारवाडी, जेलरोड परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय टेमगर, विशाल कुवर, समाधान वाजे, आणि रोहित शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी संदीप रावजी बर्डे (वय ३३, रा. टाकळी, आदिवासी वाडा) याला ताब्यात घेतले.
आरोपीकडून चौकशीदरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याची कबुली मिळाली. पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या या मोटरसायकली जप्त करून मूळ मालकांचा शोध सुरू केला आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सपोनी प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार, आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडली.
नाशिकरोड पोलिसांची धडक कारवाई:
दुचाकी चोरटा गजाआड, पाच मोटारसायकली जप्तनाशिकरोड (प्रतिनिधी): नाशिकरोड पोलिसांनी केलेल्या कारवाईत एका दुचाकी चोरट्यास अटक करण्यात आली असून त्याच्याकडून पाच चोरीच्या मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत. चोरी गेलेल्या दुचाकी मालकांसाठी ही नवीन वर्षाची आनंदवार्ता ठरली आहे.सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई अजय देशमुख आणि नाना पानसरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पवारवाडी, जेलरोड परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार विजय टेमगर, विशाल कुवर, समाधान वाजे, आणि रोहित शिंदे यांच्या पथकाने सापळा रचून आरोपी संदीप रावजी बर्डे (वय ३३, रा. टाकळी, आदिवासी वाडा) याला ताब्यात घेतले.आरोपीकडून चौकशीदरम्यान, नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून तीन व पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दोन दुचाकी चोरल्याची कबुली मिळाली. पोलिसांनी सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या या मोटरसायकली जप्त करून मूळ मालकांचा शोध सुरू केला आहे.ही यशस्वी कारवाई पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बडेसाहेब नाईकवाडे, सपोनी प्रवीण सूर्यवंशी, उपनिरीक्षक संदीप पवार, आणि इतर पोलीस कर्मचारी यांच्या सहकार्याने पार पडली.