सोमवार, 6 जानेवारी 2025. पौष शुक्ल सप्तमी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहुकाळ – सकाळी 7:30 ते 9
“आज संध्याकाळी 6 वा पर्यन्त चांगला दिवस आहे. आज जन्मलेल्या बाळाची विष्टि करण शांती करून घेणे.
आजचे राशिभविष्य आणि
6 जानेवारी रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर शुक्र आणि शनि या ग्रहांचे वर्चस्व आहे.
तुमच्यावर शुक्राचा प्रभाव असल्याने तुम्ही प्रेमळ, कलासक्त, क्रीडाप्रेमी आणि परोपकारी आहात. जीवनाकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन सौंदर्याने भरलेला आहे. स्वछता, टापटीप, नीटनेटकेपणा याची तुम्हाला आवड आहे. आकर्षक रंगसंगती, फुले, मोहकपणा ही तुमची वैशिष्ट्य आहेत. तुम्ही चैनीवर पैसे खर्च करतात. उत्तम कपडे, दागिने, सौंदर्यप्रसाधने, सुवासीके यांची तुम्हाला आवड आहे. तुम्ही अभ्यासू आहात मात्र प्रेमात पडल्यास तुम्ही संशयी होतात. तुमच्या मुलांकडून तुम्हाला अपेक्षेप्रमाणे प्रेम मिळत नाही. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणी कठीण प्रसंगांना तुम्ही शांतपणे तोंड देऊ शकता. तुम्ही प्रेमळ आई व निष्ठावानपत्नी आहात .उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष आहात. तुम्ही हुशार, हरहुन्नरी कर्तुत्ववान व पतीशी जुळवून घेणाऱ्या आहात .तुमच्या लोकप्रियतेमुळे घरी येणारे जाणाऱ्यांची संख्या बरीच असते. स्वभावाने नम्र असून एखाद्या गोष्टीचा त्रास स्वतः करून घ्याल परंतु इतरांवर वाईट परिणाम होऊ देणार नाहीत. जे लोक विचारात उत्स्फूर्त व हुशार आहे अशांची तुमची मैत्री होते. जे मनाने अभ्यास व तत्त्वज्ञाने असतात ते तुम्हाला प्रिय असतात.
शुभ दिवस-सोमवार,गुरुवार, शुक्रवार
शुभ रंग-करडा,जांभळा
शुभ रत्न – पाचू,मोती,हिरा
आजचे राशिभविष्य
मेष:- आज संमिश्र दिवस.विवाहेच्छुकांना शुभ समाचार मिळेल.
वाहन सौख्य लाभेल. सर्व प्रकारे लाभ होतील. मन प्रसन्न राहील.
वृषभ:- आज आपल्या कामाचे योग्य कौतुक होईल. समाजात मान- प्रतिष्ठा वाढेल.कामे मार्गी लागतील. अडचणी दूर होतील. सुखद घटना घडतील.
मिथुन:- आज आर्थिक यश, शत्रू नाश होईल. मान सन्मान लाभेल
कामाच्या ठिकाणी छान अनुभव येतील.
कर्क:- आज आरोग्यच्या तक्रारी दूर होतील. मन प्रसन्न राहील. चांगले अनुभव येतील.अनपेक्षित लाभ होतील.
सिंह:- आज अष्टम स्थानी चंद्र आहे.चिडचिड टाळा. मर्जी सांभाळावी लागेल.ताणतणाव जाणवेल.
कन्या:- आज आनंदी रहाल. मोजके बोला.खर्च होतील.पाणथळ जागेवर काळजी घ्यावी.
तुळ:- आज मन आनंदी राहील. प्रवासातून लाभ होतील. स्त्रीधन वाढेल.धार्मिकतेकडे कल राहील.
वृश्चिक:- आज आत्मविश्वास वाढेल.मुलांचे दूरचे प्रवास संभवतात. कामे सुकर पार पडतील.
धनु:- आज संमिश्र दिवस आहे. शेती,वास्तू मधून लाभ होतील. धार्मिक कार्य घडेल.
मकर:- आज व्यवसायात वाढ होईल. सरकारी कामात अडचणी येतील.तुमचे अंदाज बरोबर ठरतील.विद्यार्थ्यांना यशाचे.छोटी सहल घडेल.
कुंभ:- आज निरर्थक खर्च होतील. कुटुंबीयांशी मतभेद होऊ शकतात. विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या वेळी मन एकाग्र होणार नाही. कामे यशस्वी होण्यास उशीर लागेल.
मीन:- आज नातेवाईकांशी भेटीगाठी होतील.लाभदायक दिवस.उत्साह वाढल्याने नवीन कामे सुरू करण्याची प्रेरणा मिळेल. कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल. मैत्र किंवा कुटुंबीय यांच्यासह प्रवास होऊ शकतो.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
मोबाईल-9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.