Nashik Road Police : नाशिकरोड पोलिसांची मोठी कारवाई: ३ आरोपी अटकेत, ९ गुन्ह्यांची उकल, ६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

नाशिकरोड पोलिसांची मोठी कारवाई: ३ आरोपी अटकेत, ९ गुन्ह्यांची उकल, ६.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

NashikRoad : नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या (Nashik Road Police) गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास आणि जिद्दीने ३ आरोपींना अटक करून नाशिक व अहिल्यानगर जिल्ह्यातील एकूण ९ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत ६.५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

पळसे गावातील देशी दारूच्या दुकानातून १.१५ लाख रुपयांचे ३७ बॉक्स चोरी झाल्याच्या तक्रारीवरून तपासाला सुरुवात झाली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटली. मुख्य आरोपी अश्रफ शेख आणि त्याच्या साथीदारांनी चोरीसाठी सॅन्ट्रो गाडीचा वापर केल्याचे निष्पन्न झाले. तपासादरम्यान आरोपींचे लोकेशन वैजापूर, संभाजीनगर येथे आढळून आले.

पोलीस पथकाने वैजापूर आणि मुसळगाव एमआयडीसी परिसरात सापळा रचून मुख्य आरोपी अश्रफ शेख, दिलीप यादव, आणि रजनीकांत त्रिभुवन या तिघांना अटक केली. आरोपींनी नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील ९ चोरीच्या घटनांमध्ये सहभाग असल्याची कबुली दिली.

या कारवाईत एकूण ९ चोरीचे गुन्हे उघडकीस आले. यात ६.५ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, ज्यामध्ये देशी दारूचे बॉक्स आणि इतर मालमत्तेचा समावेश आहे.

Nashik Road Police ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपआयुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी, आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली ,नाशिकरोड पोलीस Nashik Road Police ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक . बडेसाब नाईकवडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप तसेच गुन्हे शोध पथकाचे सपोनि प्रविण सुर्यवंशी, पोउनि संदिप पवार, तसेच गुन्हे शोध पथकाचे पोह अविनाश देवरे, पोह विजय टेमगर, पोह संदिप पवार, पोह संतोष पाटील, पोह विष्णु गोसावी, पोशि विशाल कुवर, पोशि समाधान वाजे, पोशि नाना पानसरे, पोशि अजय देशमुख, पोशि रोहित शिंदे, पोशि महेंद्र जाधव, पोशि अरूण गाडेकर, पोशि संतोष पिंगळ, पोशि गोकुळ कासार, पोशि सागर आडणे, पोशि नितीन शिंदे व चापोशि योगेश रानडे यांनी यशस्वीरित्या कामगिरी पार पाडली