MD Drugs : नाशिकमध्ये एम.डी. ड्रग्ज विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश! गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Nashik, MD Drugs, Racket, Crime Branch, Major Action, Drug Trafficking, Bust, Narcotics, Police Raid, Drug Peddling, Crackdown

अंमली पदार्थ विरोधी मोहिमेत पोलिसांचा मोठा यशस्वी छापा

नाशिक शहरात एम.डी. ड्रग्ज(MD Drugs) विक्री करणाऱ्या टोळीविरोधात नाशिक गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत अरबाज असलम कुरेशी (वय २७, रा. द्वारकानगरी, नाशिक) याला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून १.४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

एम.डी. ड्रग्ज (MD Drugs) विक्रीसाठी येत असताना रंगेहाथ अटक

अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वपोनि सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, आरोपी अरबाज कुरेशी हा पखाल रोड, रॉयल कॉलनी येथील गार्डनमध्ये एम.डी. ड्रग्ज विक्रीसाठी येणार होता. त्यानंतर पथकाने सापळा रचून आरोपीला रंगेहाथ पकडले.

MD Drugs १.४२ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

आरोपीकडून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:

  • १८.५ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) – ₹९२,५००
  • मोबाईल फोन आणि रोख रक्कम – एकूण ₹१,४२,८९०

एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यांतर्गत कलम ८(क), २२(ब), २९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मुंबई नाका पोलीस करीत आहेत.

पोलिसांचे विशेष अभियान सुरू

ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

विशेष मोहिमेत वपोनि सुशिला कोल्हे, संतोष नरूटे, सपोनि विशाल पाटील, पोउनि दिलीप भोई, तसेच इतर पोलीस अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला.

नाशिक पोलिसांचा इशारा – अंमली पदार्थ विक्रेत्यांवर कठोर कारवाई!

नाशिक शहरात अंमली पदार्थांच्या विरोधात विशेष पोलिसी मोहीम राबवली जात आहे. पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, शहरात ड्रग्ज विक्री करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांविरोधात कठोर कारवाई केली जाईल.

नाशिक पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा कोणत्याही बेकायदेशीर कृत्याची माहिती मिळाल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधावा.