Nashik १४ ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांची चौकसभा: ‘पोलिस आयुक्त आपल्या दारी’ उपक्रमाचा शुभारंभ
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik : पोलिस व जनतेमधील सुसंवाद वाढवून गुन्हेगारी नियंत्रण व कायदा-सुव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी नाशिक पोलिस आयुक्तालयाने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. Nashik ‘पोलिस आयुक्त आपल्या दारी’ या उपक्रमाचा शुभारंभ २२ जानेवारीपासून होणार असून, पोलिस आयुक्त संदीप कर्णिक व वरिष्ठ अधिकारी शहरातील विविध १४ ठिकाणी चौकसभा घेऊन जनतेशी संवाद साधणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत हा उपक्रम आखण्यात आला आहे. यामध्ये नागरिकांच्या समस्यांचा त्वरित निपटारा, स्वच्छता अभियान, सुकर जीवनासाठी तंत्रज्ञानाचा वापर आणि संकेतस्थळ अद्ययावत करणे यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे.
Nashik चौकसभा कार्यक्रमाचे ठिकाण व वेळा
रामकुंड: संदीप कर्णिक (पोलिस आयुक्त)
पाटीलनगर उद्यान, अंबड: प्रशांत बच्छाव (उपायुक्त)
दूधबाजार: किरणकुमार चव्हाण (उपायुक्त)
छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, ना. रोड: मोनिका राऊत (उपायुक्त)
सातपूर गाव चौकी: चंद्रकांत खांडवी (उपायुक्त)
मारुती मंदिर, आडगाव: पद्मजा बढे (सहायक पोलिस आयुक्त)
कुलकर्णी गार्डन, शरणपूर रोड: नितीन जाधव (सहायक पोलिस आयुक्त)
आनंदनगर चौकी, इंदिरानगर: शेखर देशमुख (सहायक पोलिस आयुक्त)
मनपा शाळा १२५, उपनगर: सचिन बारी (सहायक पोलिस आयुक्त)
म्हसरूळ गाव चौकी: संदीप मिटके (सहायक पोलिस आयुक्त)
शिवाजीनगर, श्रमिकनगर: संगीता निकम (सहायक पोलिस आयुक्त)
भगूर पोलिस चौकी: अंकुश चिंतामण (पोलिस निरीक्षक)
भोर टाऊनशिप, चुंचाळे: इरफान शेख (पोलिस निरीक्षक)
उपक्रमाचे उद्दिष्ट
पोलिस अधिकाऱ्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेणे आणि तातडीने उपाययोजना करणे हे या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आहे. यामुळे केवळ नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास वाढणार नाही तर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी जनतेचे सहकार्यही मिळेल.
“ही चौकसभा म्हणजे फक्त चर्चेचे व्यासपीठ नसून एक सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न आहे,” असे मत आयुक्त संदीप कर्णिक यांनी व्यक्त केले.
नाशिककरांसाठी हा उपक्रम त्यांच्यापर्यंत पोहोचणाऱ्या पोलिस यंत्रणेचा नवा दृष्टिकोन सिद्ध होणार आहे.