छत्रपती संभाजीनगर: सिल्लोड तालुक्यातील मांडणा गावात अब्दुल सत्तार यांनी वाटलेल्या साड्यांची आज होळी करण्यात आली. गावकऱ्यांनी त्यांच्या पाम्प्लेटसह या साड्यांची होळी करून आपला विरोध व्यक्त केला.
सिल्लोड तालुक्यातील वांगी गावातही काही दिवसांपूर्वी अशीच होळी करण्यात आली होती. या घटनेनंतर मांडणा गावातील ग्रामस्थांनीही या आंदोलनात सहभाग घेतला आणि सत्तार यांच्या वाटपाच्या साड्यांचा निषेध करत होळी केली.
ग्रामस्थांच्या मते, अब्दुल सत्तार यांनी गावकऱ्यांना साड्या वाटून राजकीय फायद्याचे प्रयत्न केले आहेत. या प्रकारामुळे गावात नाराजीचे वातावरण आहे.
वांगी गावापाठोपाठ मांडणा गावातही साड्यांची होळी झाल्यामुळे हे आंदोलन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.