Nashik police : विनापरवाना देशी बनावटीचे ०२ गावठी पिस्टल व ०८ जिवंत काडतुस,बाळगणारा एक इसम ताब्यात

Nashik police karwai

Nashik | शहरात विनापरवाना अग्नीशस्त्र बाळगणाऱ्यांविरोधात कारवाईच्या सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत २ गावठी पिस्तूल आणि ८ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या इसमाला अटक केली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

ही कारवाई Nashik पोलीस उपआयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार आणि सपोनि डॉ. समाधान हिरे यांच्या पथकाने केली.

Nashik पो. उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, पाथर्डी फाटा येथील जगन्नाथ चौकाजवळील समर्थनगरमधील प्रथमेश अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या धुपकरण चौधरी नावाच्या इसमाच्या कारमध्ये अवैध अग्नीशस्त्र असल्याचे समजले. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तत्काळ सापळा रचत संशयित धुपकरण रामलगन चौधरी (वय —, रा. फ्लॅट नंबर ०९, प्रथमेश अपार्टमेंट, समर्थनगर, इंदिरानगर, नाशिक, मूळ राहणार: उत्तर प्रदेश) याला ताब्यात घेतले.

त्याच्या पांढऱ्या रंगाच्या ह्युंदाई सॅन्ट्रो (MH-04 CZ-0725) कारची झडती घेतली असता, १.५८ लाख रुपये किमतीची २ गावठी पिस्तुले आणि ८ जिवंत काडतुसे आढळून आली. तसेच १.५० लाख रुपये किमतीची सॅन्ट्रो कार असा एकूण ३.०८ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताविरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची आला आहे.

ही कारवाई गुन्हे शाखा युनिट-२ च्या पथकाने केली. यात पो. उपनिरीक्षक मुक्तारखान पठाण, सहा. पो. उपनिरीक्षक राजाभाऊ गांगुर्डे, भारती देवकर, पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर, गुलाब सोनार, सुनील आहेर, वाल्मीक चव्हाण, मनोज परदेशी, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, सुनील खैरनार यांचा समावेश आहे.