Fraud : नाशिकमध्ये ७८ लाखांची फसवणूक! संशयितांनी विविध क्लृप्त्या लढवून नागरिकांना गंडा घातला

Woman molestation case Nashik

नाशिक शहरात फसवणुकीच्या (Fraud) तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये स्थानिकांसह बाहेरील संशयितांनी एकूण ७८ लाख रुपयांचा अपहार केला आहे. या प्रकरणी आडगाव, भद्रकाली आणि मुंबईनाका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Fraud : ३ कोटींचे कर्ज देण्याच्या बहाण्याने ३.४४ लाखांची फसवणूक

आडगाव पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, उमेश रामदास ढोकळे (रा. पंचवटी) यांना संशयितांनी ३ कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवले.

  • संशयित राकेश देशपांडे, गणेश करचे आणि जितेंद्र शर्मा यांनी २७ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०२४ दरम्यान,
  • डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्मद्वारे ३ लाख ४४ हजार रुपये उकळले.
  • मात्र, कर्ज मंजूर झाले नाही आणि रक्कमही परत मिळाली नाही.

याप्रकरणी सहायक पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.

ओटीपी न देता बँक खात्यातून ३.०८ लाख उडाले!

द्वारका परिसरातील काठे गल्ली येथे राहणारे मनीष मोतीराम सानप (रा. ओम कार कॉलनी) यांचीही फसवणूक झाली.

  • २९ नोव्हेंबर २०२४ रोजी त्यांच्या ॲक्सिस बँकेच्या खात्यातून ३ लाख ८ हजार रुपये
  • उत्तर प्रदेशातील कसना येथील इंडियन बँकेच्या खात्यात वर्ग करण्यात आले.
  • विशेष म्हणजे सानप यांनी कोणताही ओटीपी शेअर केला नव्हता!

तक्रार दाखल होताच पोलीस निरीक्षक मोहिते तपास करत आहेत.

स्टर्लिंग मोटर्स कंपनीला ३७ लाखांचा गंडा! कर्मचारीच निघाला दोषी

नाशिकमधील प्रसिद्ध स्टर्लिंग मोटर्स कंपनीला ३७.१९ लाख रुपयांचा फटका बसला आहे.

  • संशयित महेश शालीग्राम राठी (रा. नागपूर) याने
  • २०१९ ते २०२२ दरम्यान कंपनीचा ‘अतिरिक्त बिझनेस बोनस’ संगनमताने स्वतःच्या आणि नातेवाईकांच्या खात्यात जमा केला.
  • संशयितांनी आई शकुंतला, शीतल चावला, पार्थ मुंदडा, माधुरी मुंदडा आणि मुलगा देवांश यांच्या बँक खात्यांत रक्कम वळवली.

मुंबईनाका पोलीस ठाण्यात कंपनीच्या वतीने विवेक गोपाल माथूर (रा. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. सहायक निरीक्षक वाघ तपास करत आहेत.

फसवणुकीपासून (Fraud) सावध कसे राहाल?

अधिकृत वित्तीय संस्थांकडूनच कर्ज घ्या.
कोणत्याही अनोळखी व्यक्तीला बँक माहिती किंवा ओटीपी शेअर करू नका.
मोबाईल आणि इंटरनेट बँकिंगवर सतत लक्ष ठेवा.
संशयास्पद आर्थिक व्यवहार त्वरित पोलिसांना कळवा.

(नाशिकसह महाराष्ट्रभर फसवणुकीच्या घटना वाढत आहेत. नागरिकांनी सावध राहावे, अशी पोलीस प्रशासनाची सूचना आहे.)