Nashik Crime पेठ रोड येथे तीन वाहनांना आग (Peth Road Fire) ; संतप्त वाहन मालकाचा पोलिस ठाण्यात गोंधळ

Nashik Crime, Peth Road Fire, Vehicle Arson Case, Nashik Police Action, Strict Measures Against Miscreants)

नाशिक : ०३ फेब्रुवारी: पेठ रोड भागात समाजकंटकांनी घराबाहेर उभ्या कार आणि दोन दुचाकींना पेटवून (Peth Road Fire) दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संतप्त झालेल्या वाहन मालकाने पोलिस ठाण्यात थेट नुकसान भरपाईची मागणी करत गोंधळ घातला. मसरूळ पोलिसांनी त्याला समजूत घालण्याचा प्रयत्न केला, मात्र संतापाच्या भरात त्याने पोलिस ठाण्यात अर्धनग्न होऊन निषेध व्यक्त केला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Peth Road Fire पूर्व वैमनस्यातून घटना घडल्याचा अंदाज

तक्रारदार राजू शर्मा (राहणार – अश्वमेध नगर, पेठ रोड) यांच्या म्हणण्यानुसार, रविवारी पहाटे त्यांच्या घरासमोर उभी असलेली कार (एमएच जी ए 13 24) आणि दुचाकी (एमएच 15 बाय 3792) यांना पेट्रोल टाकून आग लावण्यात आली. वाहनांना लागलेली आग पाहून वाहनधारक आणि नागरिकांनी मोठा आरडाओरडा केला, त्यामुळे समाजकंटक पळून गेले. परिसरातील गुन्हेगारांचे वास्तव्य आणि जुन्या वादातून अशा घटना घडत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी यापूर्वीही पोलिसांकडे केल्या होत्या.

Peth Road Fire गुन्हेगारांवर कारवाईची मागणी

या घटनेनंतर तक्रारदार शर्मा यांनी मसरूळ पोलिस ठाणे गाठून संशयित आरोपींवर तातडीने कारवाईची मागणी केली. तसेच, नुकसान भरपाई मिळावी, यासाठी पोलिस ठाण्यातच आपल्या अंगावरील कपडे काढून निषेध नोंदवला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत त्यांना वाहन विमा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच, या प्रकरणी दोन संशयितांना अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांनी सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.