Shocking! Obscene Incident with Poonam Pandey : धक्कादायक! पूनम पांडेसोबत चाहत्याचा अश्लील प्रकार; सेल्फीच्या नावाखाली गैरवर्तनाचा प्रयत्न

Shocking! Obscene Incident with Poonam Pandey

पूनम पांडेसोबत सेल्फीच्या नावाखाली गैरवर्तन

Poonam Pandey : सेलिब्रिटींसोबत सेल्फी घेण्यासाठी त्यांचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. मात्र, काही वेळा चाहत्यांचा उत्साह अतिरेक होतो आणि त्याचा गैरफायदा घेतला जातो. अभिनेत्री पूनम पांडेसोबत असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीने सेल्फीच्या बहाण्याने तिच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Poonam Pandey सेल्फी घेण्याच्या बहाण्याने किस करण्याचा प्रयत्न

व्हिडीओमध्ये दिसते की, पूनम पांडे (Poonam Pandey) एका व्यक्तीसोबत सेल्फी घेण्यास तयार होते. त्या व्यक्तीने फोन उचलताच अचानक तिला किस करण्याचा प्रयत्न केला. पूनमने तत्काळ त्याला जोरात ढकलले आणि तिथून निघून गेली. हा प्रकार पाहून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर नेटकऱ्यांच्या तीव्र प्रतिक्रिया

पब्लिसिटी स्टंट की खरा प्रकार?

सोशल मीडियावर या घटनेबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही लोकांनी या व्यक्तीच्या वागणुकीचा निषेध केला आहे, तर काहींनी हा प्रकार पब्लिसिटी स्टंट असल्याचे म्हटले आहे.

  • एका युजरने लिहिले, “हा प्रकार अत्यंत चुकीचा आहे, त्या व्यक्तीला ताबडतोब शिक्षा झाली पाहिजे.”
  • दुसऱ्या युजरने म्हटले, “उदित नारायणच्या मावशीचा मुलगा असेल.”
  • तर आणखी एका युजरने लिहिले, “सॉरी, पण हे सर्व स्क्रिप्टेड वाटतंय.”

पूनम पांडे (Poonam Pandey) नेहमीच वादात

पूनम पांडे ही सोशल मीडियावर सतत चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे. याआधी तिने भारताने वर्ल्ड कप जिंकल्यास टॉपलेस होण्याचे विधान करून प्रसिद्धी मिळवली होती. तसेच, काही महिन्यांपूर्वी तिने स्वतःच्या मृत्यूची खोटी बातमी पसरवून लोकांना गोंधळात टाकले होते. त्यामुळे याही घटनेबाबत लोकांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आहेत.

सेलिब्रिटी आणि चाहत्यांमधील मैत्रीपूर्ण नातं अनेकदा अशा घटनांमुळे तणावग्रस्त होतं. सेल्फी घेण्याच्या बहाण्याने गैरवर्तन होणे ही गंभीर बाब आहे. या प्रकरणावर पूनम पांडेकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही, मात्र हा प्रकार तिला नक्कीच अस्वस्थ करणारा ठरला असणार.