उत्सव काळात अन्न भेसळ थांबवण्यासाठी FSSAI कडून कडक निर्देश

Fssai karwai

उत्सव काळात मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थांच्या मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता असते. ग्राहकांच्या आरोग्याला धोका पोहोचू नये यासाठी अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने कठोर उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या अन्न सुरक्षा आयुक्तांना मिठाई, फरसाण, दूध, तूप, खोवा आणि पनीर यांसारख्या उत्पादनांवर विशेष लक्ष ठेवण्याचे आदेश दिले आहेत.FSSAI च्या निर्देशानुसार, काही उत्पादक वाढत्या मागणीचा फायदा घेऊन अन्नपदार्थांमध्ये भेसळ करू शकतात. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष देखरेख आणि अंमलबजावणी मोहिमा राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संभाव्य भेसळ रोखण्यासाठी फूड सेफ्टी ऑन व्ह‍िल्स (FSW) युनिट्स विविध बाजारपेठांमध्ये तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.या उपाययोजनांमुळे उत्सव काळात विक्री होणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याची शक्यता कमी होईल आणि ग्राहकांना सुरक्षित अन्न मिळेल, असे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply