नाशिक – Sudhakar Badgujar Joins BJP | नाशिकच्या राजकारणात भूकंप, सुधाकर बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश; स्थानिकांचा तीव्र विरोध

Sudhakar Badgujar Joins BJP | Earthquake in Nashik politics, Sudhakar Badgujar joins BJP; Strong opposition from locals

नाशिक, 17 जून – नाशिकमधील राजकारणाला कलाटणी देत ठाकरे गटाचे हकालपट्टी केलेले उपनेते सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी अखेर भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मुंबईतील भाजप मुख्यालयात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश सोहळा पार पडला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

स्थानीय विरोध झुगारत भाजपमध्ये एंट्री

नाशिक पश्चिमच्या आमदार सीमा हिरे व इतर पदाधिकाऱ्यांच्या तीव्र विरोधाला न जुमानता बडगुजर भाजपमध्ये दाखल झाले. प्रवेशानंतर बडगुजर म्हणाले, “ज्यांचा माझ्या विरोध होता, त्यांची भूमिका लवकरच बदलेल.”

यावेळी 15 ते 20 समर्थकांसह त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. बबन घोलप, नयना घोलप व अशोक सातभाई यांचाही पक्षप्रवेश या वेळी झाला.

भाजपमध्ये प्रवेश, पण अनेकांनी केला विरोध!

बडगुजर यांच्या प्रवेशास भाजपचे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि आमदार हिरे यांनी तीव्र विरोध दर्शवला होता. त्यांच्या विरोधामागे मुख्य मुद्दे हे होते:

  • 29 गुन्हे दाखल
  • एका प्रकरणात न्यायालयीन शिक्षा (दीड वर्ष कारावास)
  • भाजपच्या वरिष्ठ नेत्यांवरील आरोप व अडचणी

भाजपच्या प्रतिक्रिया

शहराध्यक्ष सुनील केदार म्हणाले, “पक्षवाढीसाठी नेते येत असतील तर स्वागतच. पण भाजपची प्रतिमा मलीन होणार असेल, तर संयम हवा.”

दरम्यान, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बडगुजर यांच्या प्रवेशास सकारात्मक प्रतिसाद दिला. ते म्हणाले, “गुन्हे दाखल असणे व दोषी सिद्ध होणे यात फरक आहे. पक्षवाढ आणि विकास आराखड्यासाठी ही एंट्री आवश्यक होती.”

राजकीय परिणाम आणि आगामी रणनीती

या प्रवेशामुळे नाशिकच्या राजकारणात नव्या समीकरणांची नांदी झाली आहे. विधानसभा निवडणुकीत बडगुजर व सीमा हिरे आमनेसामने होते. त्यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीत याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

बडगुजर व घोलप यांनी स्पष्ट केलं की त्यांना कोणतीही पदाची अपेक्षा नाही. पक्षवाढ व नाशिकच्या विकासासाठीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा केला.