राजकीय घराण्यांचा वारसासत्ता संघर्ष तेजीत | युवा नेते निवडणुकीच्या रिंगणात
नाशिक: Nashik Politics News नाशिक जिल्ह्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये आता राजकारणातील दुसऱ्या पिढीचे नेतृत्व ठसा उमटवण्याच्या तयारीत आहे. राजकीय घराण्यांचे वारसदार आता थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असून, त्यातून नव्या नेतृत्वाचा उदय होणार आहे.
राजकीय वारसा पुढे नेणाऱ्या प्रमुख युवा नेतृत्वाचा यादी:
Nashik Politics News – या नव्या राजकीय चेहऱ्यांमध्ये मंत्री, आमदार व माजी खासदार यांचे पुत्र, कन्या आणि स्नुषा यांचा समावेश आहे. या निवडणुकीत उतरण्याची तयारी करत असलेले प्रमुख चेहरे:
- सिमंतिनी कोकाटे (मंत्री माणिकराव कोकाटे यांची कन्या)
- अर्पणा खोसकर (आ. हिरामण खोसकर यांच्या स्नुषा)
- अमृता पवार (स्व. वसंतराव पवार यांची कन्या)
- नयना गावित (निर्मला गावित यांची कन्या)
- आश्विनी आहेर (अनिल आहेर यांची कन्या)
- डॉ. भारती पवार (स्नुषा – ए.टी. पवार)
- नितीन पवार (पुत्र – ए.टी. पवार)
- गीता गोळे-पवार, जयश्री पवार, यतिन कदम, विजय गडाख, अमोल भालेराव, इंद्रजीत गावित आणि इतर
गट-गण रचना आणि उमेदवार हालचाली
गट-गण रचना कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर इच्छुक उमेदवारांनी हालचाली सुरू केल्या आहेत. पुढील युवा नेते निवडणुकीत उतरण्याची शक्यता:
- गोकुळ झिरवाळ (मंत्री नरहरी झिरवाळ यांचे पुत्र)
- ऋषिकेश पवार (आ. नितीन पवार यांचे पुत्र)
- भूषण पगार, समीर चव्हाण, प्रमोद मेंगाळ, तुषार चारोस्कर, वैभव महाले, वामन खोसकर, गणेश बनकर, गौरव पानगव्हाणे, राहुल कोतवाल, कुणाल दराडे, अंजुम कांदे, दर्शन आहेर, अजित सकाळे इ.
वारसा नसलेले पण प्रभावी युवा नेतेही रिंगणात
राजकीय घराण्यात जन्म न घेताही, स्थानिक नेत्यांच्या मार्गदर्शनात घडलेल्या युवा नेतृत्वाचीही निवडणुकीसाठी जोमात तयारी सुरू आहे. तालुकानिहाय इच्छुकांची यादी तयार होत असून, गट रचना व आरक्षणावर यशाचे गणित अवलंबून आहे.