पाचोरा (जळगाव) : Jalgaon ACB Trap भडगाव तालुक्यातील मांडकी गावात घरकुल योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेवक व रोजगार सेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB Jalgaon) ने रंगेहात पकडले आहे. ही कारवाई २३ जून २०२५ रोजी करण्यात आली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Jalgaon ACB Trap कारवाईचा तपशील :
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, घरकुल योजनेंतर्गत मंजूर घरासाठी दुसरा हप्ता मंजूर करून घेण्यासाठी व गट क्रमांक नमुना ८ मिळवण्यासाठी ६,००० रुपयांची लाच मागण्यात आली होती. पडताळणीनंतर आरोपींनी ५,००० रुपये लाच घेण्यास तयार असल्याचे स्पष्ट झाले.
ACB च्या पथकाने सापळा रचत पंचासमक्ष लाच घेताना दोघांना रंगेहात पकडले.
पकडले गेलेले अधिकारी:
- सोनिराम धनराज शिरसाठ (वय 47) – ग्रामसेवक, मांडकी व अंतुरली बु.
- जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय 38) – रोजगार सेवक, मांडकी
(दोघेही रहिवासी – पाचोरा, जिल्हा जळगाव)
जप्त लाच रक्कम: ₹5,000
कारवाई यशस्वी करणारे अधिकारी:
- पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी – नेतृत्व (नंदुरबार ACB)
- पोलीस निरीक्षक नेत्रा जाधव – तपास अधिकारी
सहाय्यक पथक:
- पोउनि. दिनेशसिंह पाटील
- पोउनि. विलास पाटील
- पो. नाईक हेमंत पाटील
- पो. नाईक सुभाष पावरा
नागरिकांना ACB चे आवाहन:
सरकारी योजनांचा लाभ घेत असताना लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात निर्भीडपणे तक्रार नोंदवा. तुमची माहिती गोपनीय ठेवली जाईल. लाच मागणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे.