परिसरात महापालिकेची परवानगी न घेता अनधिकृतपणे जाहिरात फलक लावणाऱ्या चार व्यावसायिकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या मिळकत विभागाचे कर्मचारी राजेंद्र उगले यांनी याबाबत सिडको पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
उगले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सिडको विभागीय मनपा कार्यालयाच्या हद्दीतील कामटवाडे अंबिकानगर येथील
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
हॉटेल बनियान ट्री, भोळे मंगल कार्यालयाजवळील व्यायामशाळा, त्रिमूर्ती चौकातील नानाज हॉटेल, दिव्या एन्क्लेव्हजवळील सानप बंधू चिवडा यांचे
फलक विनापरवानगी लावण्यात आले होते.
या प्रकरणी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम २००३ आणि अॅक्ट १९९५ कलम ३ नुसार गुन्हे दाखल झाले आहेत.
राजकीय फलकांवर दुर्लक्ष
एरवी राजकीय नेत्यांचे तसेच पदाधिकाऱ्यांच्या वाढदिवसानिमित्त सिडको परिसरातील पाथर्डी फाटा, त्रिमूर्ती चौक, अंबड आणि उपेंद्रनगर यांसह अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे शुभेच्छा फलक विनापरवानगी लावले आहेत. विशेषतः बसथांब्यांवरही हे फलक दिसून येतात. मात्र, महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. सामान्य व्यावसायिकांवर कारवाई होत असताना राजकीय नेत्यांना अभय दिले जात असल्याची भावना व्यक्त होत आहे. महापालिकेने सर्वांसाठी नियम समान ठेवत कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.