पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त नाशिकसाठी महत्त्वाची पावले | मंत्री पंकजाताई मुंडे, आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे यांची उपस्थिती
नाशिक Aeronomics 2025 : डोंगररांगा, नद्या आणि निसर्गसंपन्नतेने नटलेल्या नाशिकच्या पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, क्रेडाई नाशिक मेट्रोने ‘एअरोनॉमिक्स 2025’ (Aeronomics 2025) या अभिनव मोहिमेचा शुभारंभ केला. या उपक्रमात स्वच्छ हवा, शून्य कचरा आणि सशक्त नाशिक ही मुख्य उद्दिष्टे ठेवण्यात आली आहेत.
मंत्री पंकजाताई मुंडेंचा पर्यावरणपूरक संदेश
पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजाताई मुंडे म्हणाल्या, “शाश्वत प्रगती ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. राज्यातील 52% सांडपाणी अजूनही थेट नद्यांमध्ये सोडले जाते, ही गंभीर बाब असून यासाठी शासन युद्धपातळीवर सांडपाणी प्रक्रिया केंद्र उभारत आहे.” त्यांनी ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी वाढवण्यावरही भर दिला.
क्रेडाईचे संकल्प व पुढील योजना
क्रेडाई नाशिक मेट्रोचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी स्पष्ट केले की, “Aeronomics 2025 ही फक्त एक पर्यावरण चळवळ नसून नाशिकच्या सामाजिक व आर्थिक उत्कर्षाचा रस्ता आहे. हवेचा दर्जा सुधारण्यापासून ते कचरा व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.”
उदय घुगे (मोहिमेचे समन्वयक) यांनी सांगितले की, “शहरातील व्यावसायिक, सामाजिक संस्था आणि नागरिक यांचा उत्स्फूर्त सहभाग मिळत आहे. क्रेडाईने नेहमीच नाशिकच्या हितासाठी पुढाकार घेतला आहे.”
‘एअरोनॉमिक्स 2025’ ची तीन मुख्य उद्दिष्टे:
- हवेचा दर्जा सुधारणा (AQI सुधारणा)
- स्वच्छ इंधन आधारित वाहतूक
- औद्योगिक प्रदूषण नियंत्रण
- वृक्षारोपण व हरित क्षेत्र वाढवणे
- शून्य कचरा धोरण
- रिसायकलिंग आणि कम्पोस्टिंग
- आधुनिक घनकचरा व्यवस्थापन
- जनजागृती व लोकसहभाग
- सशक्त नाशिकसाठी उपक्रम
- ग्रीन सिटी म्हणून नाशिकची नोंदणी
- स्टार्टअप स्पर्धा व रोख बक्षिसे
- पर्यावरण साक्षरतेची शपथ व व्यापक वृक्षारोपण
प्रमुख वक्त्यांचे मनोगत (Aeronomics 2025)
- मनिषा खत्री (महानगरपालिका आयुक्त) व अविनाश ढाकणे (महाराष्ट्र प्रदूषण मंडळ) यांनी प्रदूषण नियंत्रण, कचरा व्यवस्थापन आणि भविष्यातील योजनांवर सविस्तर माहिती दिली.
- आ. देवयानी फरांदे, आ. सीमा हिरे, आ. राहुल आहेर यांनी आपल्या भाषणांतून पर्यावरणासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.
नाशिकच्या संघटनांचा व्यापक सहभाग
या उपक्रमात नाशिक सिटीजन फोरम, NICE, NIMA, IMA, आयटी असोसिएशन, लघुउद्योग भारती, बिल्डर्स असोसिएशन, अशा ३० हून अधिक नामवंत संस्था सहभागी झाल्या.
महत्त्वाचे निर्णय आणि पुढील टप्पे:
- Indian Green Building Council मध्ये नाशिकची नोंदणी
- स्टार्टअप स्पर्धा व नवकल्पनांना प्रोत्साहन
- वृक्षारोपण व पर्यावरण साक्षरतेचे अभियान
- कुंभमेळा २०२७ साठी पर्यावरण ब्रँड अॅम्बेसेडर नियुक्तीचा प्रस्ताव