भारत | २०२५
जिथे पारंपरिक पिनकोड (PIN Code) प्रणाली अजूनही वापरात आहे, तिथे आता डिजिटल इंडिया मोहिमेअंतर्गत एक नवा पर्याय चर्चेत आला आहे — DigiPIN! म्हणजेच, आता तुमचा पत्ता फक्त ६ अंकी कोडवर आधारित नसेल, तर युनिक डिजिटल लोकेशन कोड असणार आहे!
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
DigiPIN म्हणजे काय?
- DigiPIN म्हणजे डिजिटल स्वरूपात तयार केलेला एक युनिक लोकेशन कोड.
- प्रत्येक घर, दुकान, संस्था यांना GPS आधारित डिजिटल ऍड्रेस कोड (DAC) देण्यात येतो.
- हे कोड पोस्टल डिलिव्हरी, ई-कॉमर्स, आपत्कालीन सेवा, सरकारी सेवा यासाठी वापरले जातात.
- ही प्रणाली पारंपरिक पिनकोडपेक्षा अधिक अचूक, सुरक्षित आणि लोकेशन-स्मार्ट आहे.
बाब | पारंपरिक पिनकोड | Digipin |
---|---|---|
ओळख | ६ अंकी कोड | युनिक डिजिटल लोकेशन |
अचूकता | एरिया बेस्ड | बिंदीसारखा अचूक पॉईंट |
वापर | पोस्ट व पार्सल | GPS, IoT, स्मार्ट डिलिव्हरी |
भविष्यात उपयोग | मर्यादित | स्मार्ट सिटी, गतीशक्ती |
Digipin चे फायदे
- स्मार्ट ऍड्रेसिंग: प्रत्येक स्थळाचे युनिक कोडिंग
- जलद आणि अचूक कुरिअर सेवा
- ई-कॉमर्स डिलिव्हरी सुधारणा
- रूरल व अॅड्रेसलेस भागातही ओळख शक्य
- सरकारी कागदपत्रांशी थेट लिंकिंग
कोण आणतोय Digipin?
- भारतीय पोस्ट विभाग, डिजिटल इंडिया मिशन, आणि नीती आयोग यांच्या संयुक्त पुढाकारातून
- Smart Cities, PM Gati Shakti, आणि Bhu-Aadhaar Project अंतर्गत याची चाचणी सुरू आहे
Digipin कधीपासून सुरू होईल?
- २०२५ मध्ये काही पायलट शहरांमध्ये परीक्षण सुरू आहे
- देशपातळीवर लागू होण्यासाठी २०२6-२७ हे शक्य लक्ष्य