शारदीय नवरात्र उत्सव: भाविकांची भक्ती आणि श्रद्धा
“सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते” या मंत्राने आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात झाली आहे. हिंदू धर्मानुसार, नवरात्र म्हणजे देवीची आराधना, भक्ती आणि विशेषतः शक्तीची पूजनाची पर्वणी. या पर्वात घराघरात घटस्थापना करण्यात येते आणि उपवासा सोबत देवीचा जागर आणि गजर सुरू होतो.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नवरात्राच्या या पवित्र उत्सवामध्ये देवीचे साडेतीन शक्तीपीठ खास महत्वाचे मानले जातात. यामध्ये तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, आणि माहूरची रेणुका यांचा समावेश आहे. याशिवाय, अर्धपीठ असलेल्या वनीच्या सप्तशृंगी देवीच्या शक्तीपीठावरून जिल्ह्यातील गावागावातील तरुण भाविक आपल्या गावातील मंदिरात घटस्थापना करण्यासाठी पायी ज्योत आणण्यासाठी जात आहेत.
पायी ज्योत आणि भक्तांची उत्सुकता
गावागावात पायी ज्योतीचे उत्स्फूर्त स्वागत केले जात आहे. महिलांकडून ज्योतीचे औक्षण करण्यात येते, ज्यामुळे भक्तांची श्रद्धा आणि भक्तिभाव अधिक वृद्धिंगत होत आहे. विशेषतः शेवगाव तालुक्यातील बालमटाकळी येथे तरुण भाविक गेल्या बारा वर्षांपासून दरवर्षी एका देवस्थानवरून पायी ज्योत घेऊन येत आहेत.
यावर्षी, त्यांनी पाचशे किलोमीटर पायी प्रवास करून कोल्हापूर येथून ज्योत आणली आहे. या जल्लोषाच्या निमित्ताने गावातून मिरवणूक काढण्यात आली असून ज्योतीचे व तरुण भाविकांचे भव्य स्वागत करण्यात आले आहे. यामुळे गावात एकत्रितपणा आणि भक्तीचा रंग अधिक गडद झाला आहे.
या मिरवणुकीत अनेक स्थानिक नागरिक, शालेय विद्यार्थ्ये, महिला आणि वृद्ध यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सर्वत्र देवीच्या जयघोषात वातावरण गाजत होते. प्रत्येक घरात घटस्थापना करण्यासोबतच देवीच्या आरतीत सहभागी होण्याचा मोठा उत्साह होता.