वरुण धवनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण त्याचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बेबी जॉन’ Baby John अखेर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. दिग्दर्शक कलीस यांनी दिग्दर्शित केलेल्या या अॅक्शन-थ्रिलरमध्ये वरुण धवन DCP सत्य वर्माच्या जबरदस्त भूमिकेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाद्वारे कीर्ती सुरेशने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
DCP सत्य वर्मा (वरुण धवन) हा न्यायप्रिय आणि निडर पोलीस अधिकारी आहे. परंतु, जेव्हा एक कुख्यात गुंड नाना (जॅकी श्रॉफ) त्याच्या कुटुंबावर हल्ला करतो, तेव्हा सत्यला स्वतःच्या आयुष्याचा नवा मार्ग निवडावा लागतो. सत्यची पत्नी मीरा (कीर्ती सुरेश) त्याला पाठिंबा देते, तर राजपाल यादव यांनी महत्त्वाची भूमिका निभावली आहे.
चित्रपटात धडाकेबाज अॅक्शन सीक्वेन्स, भावनिक कथानक आणि जॅकी श्रॉफ यांचा दमदार परफॉर्मन्स पाहायला मिळतो. पण, चित्रपटाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळाला का? जाणून घ्या संपूर्ण रिव्ह्यू.
हे पण वाचा: Shobhita Shivanna : “कन्नड अभिनेत्री शोभिता शिवन्नाचा मृतदेह घरात आढळला: आत्महत्येचा तपास सुरू”